अग्नीशस्रासह परत एकास केली स्थानिक गुन्हे शाखेने अटक..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थागुशा पथकाने अग्निशस्रासह आणखी एका इसमास केली अटक…

अलिबाग (प्रतिनिधी) – दि.8 जानेवारी रोजी रोहा येथील धनगर आळीत एका व्यक्तीकडे अग्नीशस्त्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे यांच्या पथकाला या ठिकाणी तपास करण्याचे निर्देश दिले. पोलिस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा तन्मय सतीश भोगटे, (वय 24), रा.धनगर आळी, ता.रोहा याच्या घरझडतीमध्ये मोठा शस्त्रसाठा, बंदूक, काडतूसे बनविण्याचे साहित्य आणि वन्यजीवांचे अवशेष आढळून आले. या ठिकाणाहून ४ बारा बोरच्या बंदूका, १ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर, ५ धारधार चाकू, २ तलवारी, ६ कोयते, ९०जिवंत काडतुसे, ५ रिकामे काडतूस, बंदूक आणि काडतूसे बनविण्याचे साहित्य, हरीण, सांबर, काळवीट यांसारख्या वन्यजीवांची २२ शिंगे जोडी पोलिसांनी ताब्यात घेतली. आणि रोहा पोलिस ठाण्यात गु.र.नं 08/24 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 4, 5 (क), (ख), 7 (क), (ख), 25 सह वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2 (31), 48, 51 अन्वये गुन्हा दाखल केला. आता सदर गुन्हयाचा तपास पोउपनि.धनाजी साठे हे करीत असुन सदर गुन्हयातील आरोपी नामे तन्मय भोगटे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास (दि.12जानेवारी) पावेतो पोलीस कोठडी दिली आहे.





सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान अटक आरोपीत याने त्याने बनविलेले ठासणीची बंदुक इसम नामे लक्ष्मण जानु हिलम (वय40 वर्ष), रा.तारणे अदिवासीवाडी, ता.तळा, जि. रायगड यास दिले असल्याचे सांगितल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे एक ठासणीची बंदुक मिळुन आल्याने ती रितसर पंचनामा करुन गुन्हयात जप्त करुन इसम नामे लक्ष्मण जानु (वय40 वर्ष), रा.तारणे अदिवासीवाडी, ता.तळा, जि. रायगड यास अटक करण्यात आली आहे. अधिकचा तपास पोउपनि/श्री. धनाजी साठे करीत आहेत.



अशा प्रकारे सदरची कामगिरी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक, अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, बाळासाहेब खाडे यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे व तपास पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!