दरोडा टाकायला पुर्ण तयारीनिशी आले आणि पोलीसांचे सावज झाले…विटा सांगली पोलिसांची मोठी कार्यवाही
विटा(सांगली) – सवीस्तर व्रुत्त असे की फुल प्लानिंग करुन आणि तयारी करून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सहाजणांची ही टोळी रेकॉर्डवर असल्याचे समजते. पोलिसांनी त्या दरोडेखोरांकडून एक कार, रोकड, चार मोबाईल, लोखंडी कटावणी, कोयता, चाकू, पक्कड, नायलॉनची दोरी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड असे दरोड्याचे सामान ताब्यात घेतले. तसेच या चोरट्यांकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची माहिती विटा येथील पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी
दिली. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भिवघाटकडे येणाऱ्या या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
१)जितेंद्र भानुदास काळे (वय ३०, रा. मार्डी, सोलापूर),
२)शिवाजी रामा काळे (वय २६, रा. जत)
३), दादाराव लक्ष्मण पवार (वय ४२, रा. राणमासळे, सोलापूर), ४)सुखदेव शिवाजी काळे (वय ३२, रा. मार्डी, सोलापूर),
५)किरण शिवाजी काळे (वय २९, रा. मार्डी, सोलापूर),
६)बालाजी माणिक पवार (वय २६, रा. मार्डी, सोलापूर)
अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरोडेखोरांची एक टोळी भिवघाटमार्गे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने रात्री येत असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्याद्वारे मिळाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईसाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली. विटा-भिवघाट रस्त्यावर पोलिसांच्या या पथकांनी मध्यरात्री सापळा रचला. खबऱ्याने ज्या कारची माहिती दिली होती, तीच कार पोलिसांनी अडवली असता,
त्यामध्ये सहा जण होते. पोलिसांनी त्यांना बाहेर काढून कारची झडती घेतली असता दरोड्याचे सर्व सामान आढळले. पोलिसांनी
त्यांच्याकडून चार मोबाईल, लोखंडी कटावणी, कोयता, चाकू, पक्कड, नायलॉनची दोरी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड तसेच रोख रक्कम आणि कारही जप्त केली. तसेच सहाही दरोडेखोरांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. त्यांच्यावर सोलापूर
जिल्ह्यात दरोडा,जबरी चोरी, चोरी असे तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातही गुन्हे केले आहेत का याचा तपास विटा पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.