
अज्ञात चोरट्याने फार्मा कंपनीमध्ये मारला डल्ला…
Facebook Like / Share
Instagram Follow
YouTube Like / Subscribe
सातारा – क्षेत्र माहुली येथील एका कंपनीतून 26 हजारांच्या साहित्याची अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस
ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान प्रफुल्ल शरदकुमार
इंगळे रा. विकास नगर, खेड, सातारा यांच्या क्षेत्र माहुली, खावली गावच्या पाठीमागे असलेल्या सुपरटेक बायो फार्मा कंपनीतून
अज्ञात चोरट्यांनी 26 हजार रुपये किंमतीचे लोखंडी गिअर बॉक्स आणि तीन लोखंडी प्लेटा चोरुन नेल्या आहेत. अधिक तपास
महिला पोलिस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.




