सोलापुर येथे पोलिस शिपायाने स्वतःवर गोळी झाडुन केली आत्महत्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सोलापूर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाने  केशव नगर पोलिस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट (वय ३५) असं या पोलिस शिपायाचे नाव
आहे. आज सकाळी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट हे पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते. सोलापूर शहर पोलिस दलातील एका पोलिस शिपायाने आत्महत्या
केल्याने सोलापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी राहुल शिरसट यांना मृत घोषित केले आहे.सुरक्षेसाठी राहुल शिरसट यांच्याकडे नेहमी SLR रायफल होती. ड्युटी संपल्यानंतर राहुल रायफल जमा करत होते.

आज बुधवारी सकाळी ड्युटी संपल्यानंतर राहुल यांनी रायफल जमा न करता, रायफल घरी घेऊन गेले. केशव नगर पोलिस वसाहतीत त्यांनी राहत्या घरी हनुवटीवर रायफल ठेवून ट्रिगर दाबला. रायफलच्या आवाजाने केशव मगर पोलिस वसाहत हादरली. भाऊबीज असल्याने केशव नगर पोलिस वसाहतीत मोठ्या आनंदाचे वातावरण होते. राहुल यांनी अज्ञात कारणावरून पोलिस वसाहतीत रायफलची गोळी झाडून आत्महत्या केली. आजूबाजूला राहत असलेल्या पोलिसांनी राहुल यांच्या रूमकडे धाव
घेतली. त्यावेळी राहुल शिरसट हे रक्ताच्या थारोळ्यात
पडले होते. राहुल शिरसट हे २०११ साली मुंबई पोलिस दलात भरती झाले होते. २०१७ साली सोलापूर शहर पोलिस दलात
त्यांची बदली झाली होती. राहुल शिरसट सोलापूर शहर पोलिस दलात बदली होऊन आल्यानंतर सदर बाजार पोलिस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली होती. प्रशासकीय कारणास्तव राहुल यांची बदली मुख्यालयात झाली होती. पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर अनेक महिन्यांपासून राहुल सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होते. राहुल यांचे वडील सोलापूर पोलिस दलात अनेक वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. राहुल यांचा भाऊ देखील सोलापूर शहर
पोलिस दलात कार्यरत आहे. तर राहुल यांची पत्नी सोलापूर ग्रामीण पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. राहुल यांची बहीण महाराष्ट्र पोलिस दलात अधिकारी पदावर कार्यरत आहे. अख्ख कुटुंब पोलिस दलात कार्यरत असलेल्या राहुल यांनी भाऊबीजेला टोकाचं निर्णय घेत आत्महत्या का केली? याच कारण अद्याप समजू शकलं नाही.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!