
मोका सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी स्थागुशा पथकाने केला जेरबंद…
मोका गुन्हयातील बार्शी न्यायालयातुन पलयान केलेला, सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद…
सोलापुर(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
बार्शी तालुका पोलिस ठाणे गु. र.न -226/21 भादवि कलम -353,309,225,34 या गुन्हयातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी यास दिनांक 07/12/2023 रोजी मा. सत्र न्यायालय बार्शी यांचे न्यायालयात हजर करुन पुन्हा जिल्हा कारागृह येथे जमा करणेसाठी घेवुन जात असताना, सदर आरोपीने नैसर्गीक विधीचा बहाणा करुन बार्शी न्यायालयातुन पळुन गेला होता.
सदर बाबत बार्शी शहर पोलिस ठाणे येथे गुरनं 1055/2023 भादवी कलम 224 अन्वये आरोपी याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द सोलापूर ग्रामीण जिल्हयातील विविध पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी विरुध्द वैराग पोलिस ठाणे गुरनं 174/2021 भादवि क.395,397,420, यास गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी 1995 चे (मोका) कलम 3 (1) (ii), 3(2),3(4). प्रमाणे लावण्यात आले आहेत.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सदर घटनेची गांर्भीयाने दखल घेवुन पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांना सदर आरोपीचा तात्काळ शोध घेवुन ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाने
सदर सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे व पोउपनि सुरज निंबाळकर यांचे पथक शोध घेत होते. सदर आरोपीचा शोध घेत असताना नमुद आरोपी हा बार्शी तालुक्यातील लोडोळे गावा शेजारील आरोपीचे नातेवाईंकाचे घरी शेतामध्ये येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने, सदर बातमी प्रमाणे सपोनि धनंजय पोरे व पोउपनि सुरज निंबाळकर यांचे पथकाने लोडोळे गावातील आरोपीचे नातेवाईंकाचे घरी शेतामध्ये आरोपी यास सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपीस यास बार्शी शहर पोलिस ठाणे यांचे ताब्यात पुढील कायदेशीर कारवाई करीता देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे, , अपर पोलिस अधीक्षक, प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली सपोनि धनंजय पोरे, पोउनि सुरज निंबाळकर यांचे टिम मधील ग्रेड-पोउपनि- राजेश गायकवाड, सफौ महमद इसाक मुजावर, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, ,पोहवा धनाजी गाडे,परशुराम शिंदे, सलीम बागवान,विजयकुमार भरले, पोशि यश देवकते,अक्षय डोंगरे, चापोशि सतीश कापरे, यांनी बाजवली आहे.




