दरोडा व घरफोडीच्या अट्टल आरोपीस LCB पथकाने मुद्देमालासह घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने माळशिरस येथील दरोडा व घरफोडीतील पाहिजे असलेल्या आरोपीस जेरबंद करुन नातेपुते येथील 03 घरफोडी चोरीच्या गुन्हयांची केली उकल, 17 तोळे सोन्याचे दागिनेसह एकूण 11,55,000/- रू.किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत….

सोलापुर(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि 09/08/2023 रोजी पहाटे 02.00 वा. ते 03.45 वा. चे दरम्यान केंजळेवस्ती, धर्मपूरी, ता. माळशिरस जि. सोलापूर येथे फिर्यादी सुभाष नरहरी केंजळे, रा. केंजळेवस्ती, धर्मपुरी, ता. माळशिरस यांचे राहते घराचे कुलुप तोडुन 4 लोखंडी पेटया घराबाहेर घेवुन जावुन 1,45,000/- रू. रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकुण 4,54,000/- रू. किंमतीचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला असे  फिर्यादी सुभाष नरहरी केंजळे, रा. केंजळेवस्ती, धर्मपुरी, ता. माळशिरस यानी दिल्याने 253/2023, भादवि 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.





सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे मालाविषयी गुन्हयांचे संदर्भात आढावा बैठक घेवून, बैठकीमध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हयातील, दिवसा व रात्री घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत तसेच जिल्हयातील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेणेबाबत पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा यांना सुचना दिल्या.



त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सुरेश निंबाळकर यांनी सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथकास घरफोडी चोरीचे गुन्हे व पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेणेकामी आदेशीत केले होते त्यानुसार. सहा.पोलीस निरीक्षक, नागनाथ खुणे व त्यांचे सोलापूर ग्रामीण जिल्हयातील पाहिजे असलेले व फरारी आरोपींचा शोध घेणेकामी अकलुज शहरात हजर असताना, सपोनि नागनाथ खुणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, नातेपुते पोलिस ठाणे गुरनं 253/2023 भादवि 457, 380 प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकार्डवरील सराईत गुन्हेगार देवगन बापु उर्फ विजय पवार रा. आटपाडी याने त्याचे इतर साथीदार यांचेसोबत केला असून तो सध्या अकलुज शहरातील गांधी चौक येथे नातेपुतेकडे जाण्याकरीता थांबला आहे.



त्यावेळी सहा.पोलीस निरीक्षक, नागनाथ खुणे व त्यांचे पथकाने त्याठिकाणी जावुन सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले व त्याचेकडे गुन्हयांचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने त्याचे इतर साथीदारांसह मिळून मागील एक वर्षापुर्वी नातेपुते हद्दीतील धर्मपुरी येथे घरफोडीचा गुन्हा केला असल्याबाबत कबुली दिली आहे. त्यानंतर सदर आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने व त्याचे इतर साथीदारासोबत माळशिरस येथे आणखी 02 घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच त्याने गुन्हयातील चोरलेले 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 11,55,000/- रू. किंमतीचा मुददेमाल त्याचे सास-याचे राहते घरातून फौंडशिरस ता. माळषिरस जि. सोलापूर येथून हस्तगत केला सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्हयातील दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथकास यश प्राप्त झाले आहे.

तसेच यातील आरोपी  देवगन बापु उर्फ विजय पवार याचे कडून 02 घरफोडी चोरी व 01 चोरीचा गुन्हा उघडकीस आलेले गुन्हे:-. पोलीस ठाणे गुरनं व कलम 01) नातेपुते पोलिस ठाणे, सोलापूर ग्रामीण गुरनं 253/2023 भादविसंक 457, 380 प्रमाणे.02) नातेपुते पोलिस ठाणे, सोलापूर ग्रामीण गुरनं 170/2024 भादविसंक 457, 380 प्रमाणे.03) नातेपुते पोलिस ठाणे, सोलापूर ग्रामीण गुरनं 171/2024 भादविसंक 380 प्रमाणे.सदरचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हयातील दागिने हस्तगत करण्यात आले.तसेच यातील आरोपी  देवगन बापु उर्फ विजय पवार याचेवर एकुन सोलापुर ग्रामीण तसेच आटपाडी जि सांगली येथील १० पेक्षा अधिक गुन्ह्यात असलेले तो पाहीजे होता

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलिस अधीक्षक, प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलिस निरीक्षक. नागनाथ खुणे, सपोनि महारूद्र प्रजणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ नारायण गोलेकर, विजय पावले महिला पोहवा मोहिनी भोगे, पोहवा धनाजी गाडे, सलीम बागवान, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, सागर ढोरे .पाटील, अक्षय डोंगरे, चानापोशि समीर शेख यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!