यलम्मा देवीचे दागीने चोरणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कासेगाव येथील यल्लमा देवीच्या मंदीरातील दागिण्यांच्या चोरीचा गुन्हा व इतर दोन गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणला यश…

सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७ डिसेंबर २०२३ रोजीचे रात्री मौजे कासेगाव, ता. पंढरपूर येथील यल्लम्मा देवीच्या मंदीरामध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून यल्लम्मा देवीचा चेहरा असलेला मुखवटा, चांदीचे केवड्याचे पान, देवीच्या पादुका व
प्रभावळ असे एकूण ४,७५,०००/- रूपये किंमतीचा माल चोरी करून नेला होता. त्याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाणे येथे गु.र.नं. ८३५/२०२३, भा.द.वि.क.४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. चोरीच्या गुन्ह्याच्या गुन्ह्यास वरीष्ठ पोलिस अधिकारी यांनी भेट देवून घटनास्थळाची पाहणी करून गुन्हा उघडकीस आणनेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक  सुरेश निंबाळकर,, यांना सुचना दिल्या होत्या. त्यावरून पोलिस निरीक्षक निंबाळकर यांनी गुन्हा उघडकीस आणनेकामी सपोनि शशिकांत शेळके व त्याचे पथकास  गुन्हा उघडकीस आणनेकामी मार्गदर्शन केले होते. त्यावरून सपोनि शशिकांत शेळके यांचे पथकाने सदर भागातील गोपनिय बातमीदार यांचे सतत संपर्क राहून तसेच जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात पेट्रोलिंग करून हा गुन्हा करणारे आरोपींची माहिती काढली होती. त्यानुसार मिळालेल्या माहितीवरून कासेगाव येथील यल्लमा देवीच्या मंदीरातील देवीच्या चांदीच्या दागिण्यांची
चोरी ही करकंब येथील मुळचा राहणारा व सद्या कवठे महाकाळ जि. सांगली येथे राहणाऱ्या आरोपीने केला असल्याची
माहिती मिळाली होती.
त्यानुसार सदरचा आरोपी हा सिताराम साखर कारखाना, खर्डी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून सपोनि शशिकांत शेळके यांनी सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेतलेत्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम राजु काळे वय २५ वर्षे रा. बोचरे वस्ती ,वागदरा करकंब,ता.पंढरपुर असे सांगितले  त्याचेकडे अधिक तपास करता त्याने यल्लमा देवीचे दागिणे चोरले असल्याचे कबूल करून साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार सदर आरोपींचा शोध घेत असताना आणखी एक आरोपी हा लोकमंगल साखर कारखाना, बीबी दार फळ, ता. उत्तर सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यास देखील पथकाने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रवी शावरप्पा पवार वय २८ वर्ष रा. सोन्याळ  ता. जत जि.सांगली असे सांगितले त्याचा अधिक तपास करता त्यांनी पंढरपूर तालुक्यातील इतर २ असे एकूण ३ घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबूली दिली आहे. सदर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्यातील मुद्देमाल व इतर साथीदारांबाबत तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी ही  शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर अपर पोलिस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा.सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली शशिकांत शेळके, सहायक पोलिस निरीक्षक, यांचेसह श्रेणी पोलिस
उपनिरीक्षक, राजेश गायकवाड, सफौ. नारायण गोलेकर, पोहवा धनाजी गाडे, मोहन मनसावाले, नापोशि धनराज गायकवाड, पोशि अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, यश देवकते, चालक समीर शेख यांनी पार पाडली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!