अक्कलकोट येथील चोरीचे गुन्ह्यांत स्थानिक गुन्हे शाखेने एका महीलेस घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सोलापूर ग्रामीण स्थागुशा ने अक्कलकोट येथील चोरीचा गुन्हा केला उघड…

सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अक्कलकोट येथील चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या मध्ये गुंगारा देणाऱ्या महिलेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधाराने शिताफीने अटक करून गुन्हयातील २७ तोळे सोने व ५६ ग्रॅम चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा १६,७६,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की,दि.१५डिसेंबर २०२३ रोजी रात्री २०:३० वा.सु. ते दि.२१डिसेंबर २०२३ रोजीच्या सकाळी ११:४० वा. च्या दरम्यान अक्कलकोट शहरातील खासबाग भागातील फिर्यादीच्या राहते घरामध्ये कोणीतरी अज्ञात चोरटयाने प्रवेश करून किचन घरातील लोखंडी कपाटात ठेवलेल्या २७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ५६ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे व रोख रक्कम ५०,०००/- असा मुद्देमाल चोरून नेला होता. त्याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरनं ६५१/२०२३ भादंवि कलम ३८० प्रमाणे दि.२२डिसेंबर २०२३ रोजी दाखल करण्यात आला होता.



सदर गुन्हयात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश निंबाळकर यांनी सपोनि शशिकांत शेळके व त्यांच्या पथकास गुन्हयाचे ठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे शशिकांत शेळके व त्यांचे पथक खासबाग अक्कलकोट येथे जाऊन फिर्यादीची भेट घेवुन सविस्तर माहिती घेतली. तसेच गोपनीय बातमीदार यांना चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढण्याच्या सुचना दिल्या होत्या.



सपोनि शशीकांत शेळके व त्यांचे पथक अक्कलकोट शहरात हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फिर्यादी यांचे राहते घराचे शेजारी राहणारी एका महिलेने ही चोरी केली असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली, त्यावरून महिला पोलिस अंमलदार समवेत जावुन बातमीतील नमुद महिलेस गुन्हयाच्या चौकशीकामी ताब्यात घेवुन तिच्याकडे विचारपूस करता तीने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतू तिचा अधिक संशय बळावल्याने तिस अधिक विश्वासात घेवुन कौशल्यपूर्ण तपास केला असता, तिने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी गेलेल्या मुद्देमालातील सोन्याच्या पाटल्या, राणीहार, गंठण, मिनी गंठण, लॉकेट, बांगड्या, कानातील फुले झुबे, मोतीचूर अंगठी, नाकातील नथ असे सोन्याचे दागिणे व चांदीचे पैंजन व जोडवे असे दागिणे व ५०,०००/- रोख रक्कम असे एकूण १६,७४,०००/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अशा प्रकारे सदरची कामगिरी ही शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शशिकांत शेळके सहा. पोलिस निरीक्षक, श्रेणी पोसई राजेश गायकवाड, सफौ/ नारायण गोलेकर, पोहेकों / चनाजी गाडे, मोहन मनसावाले, महीला पोलिस अंमलदार मोहीनी भोगे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, यश देवकते, समीर शेख यांनी बजावली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!