दरोडा व जबरी चोरीच्या आरोपींकडून १ देशी पिस्टल व २ जिवंत काडतूस हस्तगत, दोन घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सोलापूर — सविस्तर वृत्त असे की, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्रे बाळगणा-या इसमांचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्ह्यांच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, व धनंजय पोरे, सहा पोलिस निरीक्षक त्यांचे नेतृत्वाखाली सफौ/ ख्वाजा मुजावर व पथक सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मालाविषयी गुन्हयाचा तपास करणेकामी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, सपोनि / धनंजय पोरे यांच्या पथकातील सफौ/ ख्वाजा मुजावर यांना गोपनिय बातमीद्वारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, पानमंगरुळ ता. अक्कलकोट गावाजवळ एक इसम विनापरवाना स्वतः जवळ देशी पिस्टल बाळगत आहे. सदर बातमी प्रमाणे संशयीत इसमास सापळा रचुन ताब्यात घेतले असता, त्याचे पॅन्टीमध्ये कंबरेवर खोवलेले १ देशी पिस्टल व मॅगझीन मधील २ जिवंत काडतुस असे एकुण ५०४००/- रु. किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
सदर छापा कारवाई बाबत अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे गुरनं ६९४/२०२३ आर्म ॲक्ट क. ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्हयाचा तपास अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे करत आहे.
आरोपी हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे त्याने सन २०२३ मध्ये खालील पोलिस ठाणे येथे दाखल गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
१) अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे गुरनं ११४/२०२३ भादंवि क. ४५७,३८०

२) अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे गुरंन ३१४/२०२३ भादंकि क. ४५४,४५७,३८०

तसेच आरोपी याचा सोलापुर ग्रामीण जिल्हयातील पाहिजे/फरारी अभिलेख पाहता. त्याने
१) अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे गुरनं १२१/२००४ भादंवि क. ३९५ (पहिजे आरोपी )

२) मंद्रुप पोलिस ठाणे गुरनं ३३२ / २०२० भादंवि क. ३९५,३९५ (पहिजे आरोपी)

३) मंद्रुप पोलिस ठाणे गुरंन ३३७/२०२० भादंकि क. ३७९, ३४ (पहिजे आरोपी)

सदरची कामगिरी ही शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर
पोलिस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा. सोलापूर ग्रामीण व सपोनि धनंजय पोरे, यांच्या नेतृत्वाखाली सफौ ख्वाजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, रवि माने, पोकॉ अन्वर अत्तार, विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, चापोकॉ दिलीप थोरात यांनी पार पाडली आहे.













WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!