
तडीपार गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने केली अटक…
तडीपार गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने केली अटक…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आदेशाने व पोलीस उपआयुक्त संदिप डोईफोडे गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टिमच्या वतीने पाहीजे आरोपी, फरारी आरोपी, तडीपार आरोपी, वाहन चोर, रेकॉर्डवरील गुन्हेगार शोध घेण्याची विशेष मोहीम सुरू होती. तेव्हा या मध्ये पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून अनेक गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार तुषार ऊर्फ तुसल्या गौतम झेंडे याला पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक केली, हा निगडी व पिंपरी पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द खुन, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्यास पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-२ यांनी (दि.२३ऑगस्ट२०२२) रोजी पासुन दोन वर्षा करीता पुणे जिल्ह्यातुन तडीपार केलेले होते.


या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२७एप्रिल) रोजी गुन्हे शाखा, युनिट १ चे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार सचिन मोरे, अमित खानविलकर, बाळु कोकाटे, फारूख मुल्ला, सोमनाथ बो-हाडे, उमाकांत सरवदे, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, विशाल भोईर, मारूती जायभाये, तानाजी पानसरे असे पोलीस पथक चिखली पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सचिन मोरे व अमित खानविलकर यांना माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार तुषार झेंडे हा साने चौक, भिसे वाईन समोरील मोकळ्या मैदानात, चिखली पुणे येथे येणार असुन त्याचे जवळ पिस्टल आहे. अशी माहिती मिळताच गुन्हे शाखा, युनिट १ चे टिमने माहितीच्या ठिकाणी जाऊन खात्री करता तडीपार आरोपी तुषार झेंडे हा साने चौक, भिसे वाईन समोरील मोकळया मैदानात कोणाचीतरी वाट बघत थांबलेला दिसला तेव्हा त्यास पकडणे कामी पोलीस स्टाफ त्याचेकडे जात असताना त्यास पोलीसांची चाहुल लागल्याने तो पळुन जाऊ लागला त्याचा पाठलाग करून थोड्याच अंतरावर तडीपार आरोपी तुषार ऊर्फ तुसल्या गौतम झेंडे, (वय २६ वर्षे), रा.उरवेला हौ.सोसा. बि.नं.०५, रुम नं.०८, ओटास्कीम, निगडी, पुणे यास मोठ्या शिताफीने पकडले. तेव्हा त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ दोन देशी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुस मिळुन आले. त्याचेकडे तपास करून त्याचे विरूध्द विनापरवाना बेकायदेशीर रित्या शस्त्र जवळ बाळगले व तडीपार आदेशाचा भंग केल्या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक शिवाजी कानडे, गुन्हे शाखा, युनिट १, पिंपरी चिंचवड हे करीत आहेत.

आरोपी तुषार ऊर्फ तुसल्या गौतम झेंडे हा निगडी व पिंपरी पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द खुन, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्यास पोलीस उप आयुक्त, परीमंडल-२ यांनी (दि.२३ऑगस्ट २०२२) रोजी पासुन दोन वर्षा करीता पुणे जिल्ह्यातुन तडीपार केलेले आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट १ चे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पोलीस उप निरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार सचिन मोरे, अमित खानविलकर, बाळु कोकाटे, फारूख मुल्ला, सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, उमाकांत सरवदे, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, विशाल भोईर, मारूती जायभाये, तानाजी पानसरे यांचे पथकाने केली आहे.


