
अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे तिघे तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात…
अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे तिघे तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात लोक वसाहत असुन गुन्हेगार हे बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र/पिस्टल बाळगुन आहेत. त्याप्रमाणे त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे पोलिस उप निरीक्षक विलास गोसावी व पथक हे तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत गस्त करून गोपनीय बातमीदार व तांत्रिक तपासाचा वापर करून अग्निशस्त्र/पिस्टल बाळगणारे यांचा शोध घेत होते. या मध्ये तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपी सचिन किसन शिंदे, गौरव कमलाकर शिंदे, अजिंक्य दादासो म्हस्कूटे, यांच्यावर विविध कलमांतर्गत लोणीकंद आणि चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


(दि.२०मे) रोजी तपास पथकाचे पोलिस उप निरीक्षक विलास गोसावी, सफौ दिलीप कदम, पो.हवा. किशोर गिरीगोसावी, पोलिस अंमलदार. प्रकाश जाधव, प्रितम सानप, हर्षद कदम असे तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना पोलिस अंमलदार हर्षद कदम यांना गोपनीय बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, काळया रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्र.एम.एच.१२ ई.एम. ६६१५ ही पुणे-मुंबई जुना महामार्गाने मुंबईच्या दिशेने जात असुन त्यातील इसमांकडे पिस्टल आहे. त्याप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी व पथक यांनी सापळा लाऊन काळया रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्र.एम.एच.१२ ई.एम. ६६१५ ही घोराडेश्वर डोंगराच्या पायथ्यालगत असलेले पुणे-मुंबई जुना महामार्गाचे रोडलगत ताब्यात घेऊन सदर गाडीतील इसम नामे १) सचिन किसन शिंदे (वय ३८ वर्षे), रा.गणपती मंदीराजवळ, लोणीकंद, ता.हवेली, जि.पुणे २) गौरव कमलाकर शिंदे (वय २० वर्षे), रा.विठ्ठल रूक्मीणी मंदीराच्या पाठीमागे, लोणीकंद, ता.हवेली, जि.पुणे ३) अजिंक्य दादासो म्हस्कुटे (वय २५ वर्षे), रा.विठ्ठल रूक्मीणी मंदीरा पाठीमागे, खामगाव, ता.दौंड, जि.पुणे यांच्याकडे चौकशी करून सखोल तपास केला असता सदर इसमांकडे काळया रंगाचे लोखंडी पिस्टल मॅग्झीनसह आणि ०४ जिवंत राउंड मिळुन आले. त्याप्रमाणे तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे दाखल गु.र.क. २९६/२०२४ कलम भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी अतिशय शिताफीने व कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी १) सचिन किसन शिंदे (वय ३८ वर्षे), रा.गणपती मंदीराजवळ, लोणीकंद, ता.हवेली, जि.पुणे २) गौरव कमलाकर शिंदे (वय २० वर्षे), रा.विठ्ठल रुक्मीणी मंदीराच्या पाठीमागे, लोणीकंद, ता.हवेली, जि.पुणे ३) अजिंक्य दादासाो म्हस्कुटे (वय २१ वर्षे), रा.विठ्ठल रुक्मीणी मंदीरापाठीमागे, खामगाव, ता. दौंड, जि.पुणे यांच्याकडुन पिस्टल ताब्यात घेतले आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त बापु बांगर, सहायक पोलिस आयुक्त देविदास घेवारे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायन्नवार, पोलिस उप निरीक्षक विलास गोसावी, सफौ. दिलीप कदम, पोहवा. किशोर गिरीगोसावी, प्रकाश जाधव, प्रितम सानप, हर्षद कदम यांनी केलेली आहे.



