ठाणे प्रेयसी हल्ला प्रकरणी अखेर तिन्ही आरोपींना अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

प्रेयसीला मारहाण प्रकरणात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. तसेच या गुन्ह्यात भादवी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न करणे ) चा समावेश नसल्यामुळे पोलिसांवर चौफेर टिका होऊ लागली असून या टिकेनंतर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी याप्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून त्यामार्फत तपास सुरू केला आहे. याप्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून आयोगाने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांकडून तातडीने अहवाल मागवला आहे….

ठाणे – सवीस्तर व्रुत्त असे,घोडबंदर येथील वाघबीळ भागात २६ वर्षीय पिडीत तरुणी  राहते. अश्वजित गायकवाड यांच्यासोबत गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा पिडीतेने केला आहे. ११ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता अश्वजीत याने घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ भेटण्यास बोलावले. तिथे झालेल्या वादानंतर त्याने मारहाण करत कारने धडक देऊन गंभीर जखमी केल्याचा आरोप पीडितेने केला होता. याप्रकरणी पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी अश्वजीत यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात दुखापत करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, इतरांचे
जिवीतास किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने जबर दुखापत पोचवणे, धमकाविणे अशी कलमे लावण्यात आली आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी अश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेडगे या तिघांना रविवारी रात्री अटक केली असून या गुन्ह्यात वापरलेली दोन चारचाकी वाहने जप्त केली आहेत.





या प्रकरणात ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित तरुणीने केली असून पीडित तरुणीच्या वकील दर्शना पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अशीच मागणी करत याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी अद्याप ही मागणी मान्य केलेली नाही. या प्रकरणात एक बड़ा उद्योगपती हस्तक्षेप करीत असून याप्रकरणात पोलिसांवर दबाब असल्याची चर्चा शहरात आहे. या प्रकरणामुळे ठाणे पोलिस टिकेचे धनी ठरू
लागले आहेत. यापार्श्वभूमीवर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी याप्रकरणाच्या सखोल तपासासाठी परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे.
ठाणे जिल्ह्यात तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली आहे.
त्याचप्रमाणे कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एक महिला तक्रारदार असून त्यात आरोपींमध्ये अश्वजित
अनिल गायकवाड आणि इतरांचे नाव आहे. याप्रकरणाच्या
सखोल तपासासाठी परिमंडळ ५ चे  पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. हे पथक सर्व बाजूने याप्रकरणाचा तपास करीत आहेत. साक्षीदारांचे जबाब नोंदविले जात आहेत. फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. तपासादरम्यान आणखी तथ्ये उघड झाल्यास
कायद्याच्या पुढील कलमांचा समावेश केला जाईल असे ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी म्हटले आहे







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!