घरफोडीतील आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ केली अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
घरफोडीतील आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने केली अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट १ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर आयसीआयसीआय बँकेतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड कऱण्यात यश मिळाले आहे. या गुन्ह्यातील आरोपीला शिताफीने अटक करून त्याच्याकडून ३९ लाख रु. किमतीचे सोने हस्तगत केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०४मे) रोजी पहाटे ०२:३० ते ०३:०० वा.चे दरम्यान आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि.शाखा गंगापुर नाका, नाशिक मध्ये झोनल बिजनेस मॅनेजर ऑफीसची खिडकी उघडुन आत प्रवेश करून मेन ऑफीस मध्ये ठेवलेल्या सेप्टी लॉकरच्या चाव्या तेथील ऑफीस मधुन प्राप्त करून लॉक असलेले सेप्टी लॉकर उघडुन ग्राहकांचे सेफ मध्ये ठेवलेले ४ कोटी ९२ लाख रूपये किंमतीचे १३.३८५ ग्रॅम सोन्याचे दागीने दोन अनोळखी इसमांनी घरफोडी करून चोरून नेले होते. या बाबत जयेश कृष्णदास गुजराथी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सरकारवाडा पोलीस ठाणे गु.२.नं. १३२/२०२४ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ३४ प्रमाणे दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा व सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा असल्याने सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेणे बाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांनी गुन्हेशाखा युनिट ०१ व ०२ यांचे पथक तयार करून त्यांना सुचना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट ०१ यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट ०१ चे सपोनि हेमंत तोडकर, पोउनि गजानन इंगळे, रविंद्र बागुल, पो.हवा.विशाल काठे, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, संदिप भांड, शरद सोनवणे, विशाल देवरे यांचे पथक तयार करून त्यांना सुचना दिल्या.
नमुद पथकाने गुन्हा घडल्या पासुन सतत ०७ दिवस अहोरात्र अथक परिश्रम करून बॅंकेमधील कर्मचारी यांचे कडे कसुन चौकशी केली तसेच घटनास्थळावरील व आजुबाजुचे सिसिटिव्ही फुटेज चेक केले तसेच आरोपी हे आय सी आय सी आय बॅंकेच्या पाठी मागील प्रमोद महाजन गार्डनच्या मागुन बाहेर कसे पडले हे सिसिटिव्हीच्या माध्यमातुन चेक केले असता दोन संशयीत इसम हे एका मोटार सायकलवर जातांना दिसले. तो धागा पकडुन वरील नमुद पथकाने सदर सिसिटिव्ही फुटेज वरून आरोपी ज्या दिशेने गेले त्या दिशेचे जवळपास सुमारे ११ किलोमिटर पर्यंत सिसिटिव्ही फुटेज पाहुन आरोपी महाराणा प्रताप चौक, सिडको, अंबड या भागातील असल्याचे निष्पन्न केले.
त्या आरोपीतांचा शोध घेत असतांना पोहवा. विशाल काठे यांना गुप्त बातमीदारा मार्फत सदर गुन्हा हा सतीष चौधरी व रतन जाधव दोन्ही राहणार सिडको नाशिक यांनी केला असल्याचे समजुन आले, सदर संशयीतांची मिळालेल्या तांत्रीक माहीतीचे सपोनि हेमंत तोडकर व पोअं. राहुल पालखेडे यांनी विश्लेषन करून सदर आय सी आय सी आय बँके मधील कर्मचारी तुकाराम गोवर्धने याने बॅकेतील तिजोरी व चावी या बाबत वी माहीती त्याचे गावातील ओळखीचा वैभव लहामगे रा.सांजेगाव ता.इगतपुरी जि.नाशिक यास दिली असल्याचे निष्पन्न केले व वैभव लहामगे याने त्याचे साथीदारांना आय सी आय सी आय बॅकेत पाठवुन बॅंके मध्ये चोरी केली आहे.
सदर प्रकरणात तुकाराम गोवर्धने याचा शोध घेत असतांना तो पाथर्डी फाटा परिसरात असल्याची माहीती मिळाल्या वरून पोउनि गजानन इंगळे, सफौ सुगन साबरे, पोहवा. देवीदास ठाकरे, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, यांनी त्याचा शोध घेऊन इसम तुकाराम देवराम गोवर्धने रा.मुळगाव सांजेगाव, ता.ईगतपुरी, जि.नाशिक यास ताब्यात घेऊन गुन्हेशाखा येथे आणले असता त्याने वरील प्रमाणे कबुली दिली आहे त्यावरून गुन्हा उघडकीस आला आहे.
तसेच आज रोजी पोहवा विशाल काठे यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, गुन्हयात निष्पन्न झालेला आरोपी सतीष कैलास चौधरी याने चोरी केलेल्या सोने पैकी काही सोने त्याचे आई कडे दिल्याची माहीती मिळाले वरून त्याची आई रेखा कैलास चौधरी हीचा शोध घेवुन तिला गुन्हेशाखा युनिट ०१ येथे बोलविण्यात येवुन त्यांचे कडे चौकशी करता तीने आरोपी सतीष चौधरी याने चोरलेल्या सोन्याच्या दागीण्यापैकी काही सोन्याचे दागीने वितळवुन त्यांच्या ०२ सोन्याच्या लगड केल्या होत्या त्या ३९,५२, ३५००० रूपये किंमतीच्या दोन सोन्याच्या लगड (गटटु) जप्त केल्या आहेत.
वरील नमुद आरोपी तुकाराम देवराम गोवर्धने रा.मुळगाव सांजेगाव, ता.ईगतपुरी, जि.नाशिक व जप्त करण्यात आलेले ३९,५२,३५००० रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या लगड असे पुढील तपास व कारवाई कामी सरकारवाडा पोलिस ठाणे, नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी तुकाराम देवराम गोवर्धने यास न्यायालयात हजर केले असता त्यास (दि.१४मे) पावेतो पोलिस कस्टडी रिमांड मिळाली असुन उर्वरित पाहीजे आरोपींचा शोध सुरू आहे.
अशा प्रकारे सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र.१ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि गजानन इंगळे, चेतन श्रीवंत, रविंद्र बागुल सफौ सुगन साबरे, पो.हवा. शरद सोनवणे, विशाल काठे, प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, नाझीम पठाण, संदिप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, देवीदास ठाकरे, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, चालक सपोउनि. किरण शिरसाठ, पो.हवा. समाधान पवार यांनी केली असुन त्यांना सदर कामगीरीत सुरेश माळोदे, धनंजय शिन्दे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ, योगीराज गायकवाड, महेश साळुंके, रुमेश कोळी, राजेश राठोड, रामा बर्डे, अनुजा येलवे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच तांत्रीक विश्लेषन शाखेचे मपोउनि नेहा सुर्यवंशी व त्यांच्या पथकाने मोलाचे सहकार्य केले आहे.