धाराशिव-जालना-बीड येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या…
धाराशिव-जालना-बीड येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या…
धाराशिव (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्रातील पोलिस उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मध्ये तीन वर्षे एका जिल्ह्यात सेवा केलेले आणि स्वजिल्हा असलेल्या अधिकाऱ्यांच्या परजिल्ह्यात बदल्या केल्या आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पोलीस अधिकारी यांच्या करावयाच्या बदल्या/पदस्थापनांबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. संदर्भान्वये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने (दि.२३फेब्रुवारी) रोजी आस्थापना मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२न, पोटकलम (२) अन्वये परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक यांच्या परिक्षेत्रांतर्गत इतर घटकात बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश विरेंद्र मिश्र विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी सहीनिशी काढले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे –
१) दिलीप राधाकिसन चौरे (छ्त्रपती संभाजी नगर ग्रा. ते जालना)
२) देविदास बाबुआप्पा खांडकुळे (छ्त्रपती संभाजी नगर ग्रा. ते बीड)
३) योगेश गोविंद पवार (छ्त्रपती संभाजी नगर ग्रा. ते बीड)
४) स्वाती नाना लहाने (छ्त्रपती संभाजी नगर ग्रा. ते बीड)
५) पवन फुलसिंग राजपुत (छ्त्रपती संभाजी नगर ग्रा. ते जालना)
६) प्रभाकर आसाराम मुंजाळ (छ्त्रपती संभाजी नगर ग्रा. ते बीड)
७) संजय मुरलीधर धुमाळ (छ्त्रपती संभाजी नगर ग्रा. ते बीड)
८) गणेश ताराचंद झलवार (छ्त्रपती संभाजी नगर ग्रा. ते धाराशिव)
९) संतोष रंगनाथ कुकलारे (छ्त्रपती संभाजी नगर ग्रा. ते धाराशिव)
१०) सेतोष उत्तमराव मरळ (जालना ते छ्त्रपती संभाजी नगर ग्रा.)
११) हरीभाऊ सखाराम राठोड (जालना ते छ्त्रपती संभाजी नगर ग्रा.)
१२) राणी पाराजी सानपे (बीड ते धाराशिव)
१३) भास्कर शंकर कांबळे (बीड ते धाराशिव)
१४) तुकाराम रघुनाथ बोडखे (बीड ते धाराशिव)
१५) शिवशंकर बळीराम चोपणे (बीड ते धाराशिव)
१६) देविदास बाजीराव आवारे (बीड ते धाराशिव)
१७) ज्ञानेश्वर दत्तात्रय राडकर (बीड ते छ्त्रपती संभाजी नगर ग्रा.)
१८) चेतन वसंतराव ओगले (बीड ते छ्त्रपती संभाजी नगर ग्रा.)
१९) भागवतराव विश्वजीत फरतडे (बीड ते छ्त्रपती संभाजी नगर ग्रा.)
२०) उत्तम संभाजी नागरगोजे (बीड ते छ्त्रपती संभाजी नगर ग्रा.)
२१) गणेश हरिभाऊ जांभळे (धाराशिव ते छ्त्रपती संभाजी नगर ग्रा.)
२२) प्रियंका वसंतराव फंड (धाराशिव ते छ्त्रपती संभाजी नगर ग्रा.)
२३) पवनकुमार उदय अंधारे (धाराशिव ते छ्त्रपती संभाजी नगर ग्रा.)
२४) स्वप्नील लक्ष्मण भोजगुडे (धाराशिव ते छ्त्रपती संभाजी नगर ग्रा.)
२५) बसवेश्वर रामचंद्र चेनशेट्टी (धाराशिव ते बीड)
२६) रमाकांत मोहनराव शिंदे (धाराशिव ते बीड)
२७) भागवत यशवंत गाडे (धाराशिव ते बीड)
२८) सुकुमार गणपत बनसोडे (धाराशिव ते बीड)
२९) अनघा अंकुश गोडगे (धाराशिव ते बीड)
३०) शिवाजी राणाबा सर्जे (धाराशिव ते बीड)
३१) रियाज करिमखान पटेल (धाराशिव ते बीड)
३२) पल्लवी संजय पवार (धाराशिव ते बीड)