गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

धाराशिव (प्रतिनिधी) – अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. नईम रहीम शेख, (वय 40 वर्षे), रा.मोमीनपुरा बीड आणि हुसेन अहमद शेख (वय 30 वर्षे), रा.मोहम्मदीया  कॉलनी बीड, ता.जि. बीड अशी अटक केलेल्यांची नावं आहेत, त्यांच्याकडून हिरा पान मसाला, विमल पान मसाला, पोते, तंबाखू, आओबाजी पान मसाला, रॉयल तंबाखू पॉकेट सह अशोक लिलँड कंपनीचे वाहन असा एकुण 28 लाख 89 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील अवैध धद्यांविषयक व मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणे कामी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ अश्विन जाधव, दिलीप जगदाळे, विनोद जानराव, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे,पोना नितीन जाधवर, अशोक ढगारे, चालक पोहेकॉ संतोष लाटे, पोअं प्रशांत किवंडे, यांचे पथक (दि.17मे) रोजी मुरुम पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक अशोक लिलँड कंपनीचे वाहन क्र.एमएच 44 यु 2405 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटख्याची वाहतुक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जाऊन सदर वाहन थांबवून चेक केले असता  सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. तसेच वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव नईम रहीम शेख, (वय 40 वर्षे), रा.मोमीनपुरा बीड, हुसेन अहमद शेख (वय 30 वर्षे), रा.मोहम्मदीया  कॉलनी बीड ता.जि. बीड असे सागिंतले. तसेच पथकाने त्यांचे ताब्यातील नमुद वाहनातुन हिरा पान मसाला 64 पोते,  विमल पान मसाला 5 मोटे पोते, व्ही- 1 तंबाखु एक खाकी रंगाचे पोते, महा रॉयल 717 तंबाखु 32 हिरवट रंगाचे पोते, आओबाजी पान मसाला 15 पोते, रॉयल 220 तंबाखु 14 पोते, हिरा पान मसाला 14 पोते, रॉयल 717 तंबाखु 7 पोते, बॅग, पॉकेट सह अशोक लिलँड कंपनीचे वाहन क्र.एमएच 44 यु 2405  असा एकुण  28,89,740/- ₹ किंमतीचा माल मिळून आला. मिळून आलेला माल जप्त करुन माल सह आरोपी नामे-1) नईम रहीम शेख, (वय 40 वर्षे), रा.मोमीनपुरा बीड, 2) हुसेन अहमद शेख (वय 30 वर्षे), रा.मोहम्मदीया कॉलनी बीड, ता.जि. बीड यांना ताब्यात घेऊन आरोपींविरुध्द पोलिस ठाणे मुरुम येथे गुरनं 124/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 188, 272, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पथकाने त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस मालासह मुरुम पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.



अशा प्रकारे सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ अश्विन जाधव, दिलीप जगदाळे, विनोद जानराव, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे,पोना नितीन जाधवर, अशोक ढगारे,  चालक पोहेक संतोष लाटे, पोअं. प्रशांत किवंडे यांच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!