खाऊचे आमिष दाखवुन करायचा लैंगिक अत्याचार नराधमास अटक…
वसई- शहरात एक धक्कदायक घटना घडली आहे. येथे एका
शाळेतील स्वयंपाक्याने सात वर्षीय मुलीला खाऊ देण्याचं
आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना
घडली आहे. पीडित मुलगी या शाळेत चौथीत शिकत असल्याची माहिती आहे. मौर्य, असं या घटनेतील आरोपच नाव आहे. पोलिसांनी
आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सात वर्षीय मुलीकडे खाऊसाठी
रोज जास्त पैसे असायचे. आपण मुलीला इतके पैसे देत नाही,
मग तिच्याकडे इतके पैसे येतात कुठून? असा प्रश्न पीडित
मुलीच्या पालकांना पडला त्यांनी याबाबत तिच्या मित्र-मैत्रीण आणि शाळेत विचारपूस करायचं ठरवलं. यानंतर पालक पीडित मुलीसोबत शाळेत आले. तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली. याच शाळेत स्वयंपाक्या म्हणून काम करत असलेला मौर्य हा मुलीला रोज खाऊसाठी पैसे देत होता. खाऊसाठी पैसे देत असताना हा नराधम रोज या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत होता. मुलीसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इतर
विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने शाळेत जमले. यावेळी संतप्त जमावाने मौर्यला चांगलाच चोप दिला. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला शांत करत आरोपीला ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.