
उसनवारीचे पैसे परत देतो अशी बतावनी करुन पिडीतेशी शारीरीक संबंध प्रस्थापित करणार्या नराधमास आर्वी पोलिसांनी केले जेरबंद…
उसनवार दिलेले पैसे परत करण्याच्या मोबदल्यात वारंवार लॅाजवर बोलाऊन शारीरीक संबंध प्रस्थापित करुन पिडीतेच्या असहायतेचा फायदा घेणार्या नराधमास आर्वी पोलिसांनी शिताफिने केले जेरबंद…
आर्वी(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील पिडीता/ फिर्यादी रा. एल. आय.जी. कॉलनी, आर्वी, ता. आर्वी, जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन आर्वी येथे दि ३० जानेवारी रोजी तक्रार दिली की, ती शहरातील एका बॅंकेत नोकरीला असुन आरोपी अक्षय सुभाश माळोदे, रा. हातगाव, ता. हातगाव, जि. नांदेड हा सुध्दा तिथेच कामाला होता


त्यादरम्यान आरोपी अक्षय याने फिर्यादी सोबत ओळख करून व तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन तिच्या कडुन टप्याटप्याने एकुण २,५८,९००/- रू. उधार घेतले व ते पैसे फिर्यादीने परत मागितले असता. फिर्यादीचे असाहयतेचा फायदा घेवुन तिला उधार घेतलेले पैसे परत करतो असे म्हणुन अमरावती येथील लॉजवर बोलावुन तिचे सोबत जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलिस स्टेशन आर्वी येथे अपराध क्रमांक ९४/२०२५ कलम ३७६, ३७६ (२) (एन) भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करुन करून तपास सुरु होता

सदर गुन्हयातील आरोपी अक्षय सुभाश माळोदे, वय ३३ वर्शे, रा हातगाव, ता. हातगाव, जि. नांदेड याचा गुप्तबातमीदार व सायबर सेल वर्धा यांचे मदतीने कसोशीने शोध घेतला असता. नमुद आरोपी हा वाशीम, जि. वाशीम येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयात दि १५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आल

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, आर्वी देवराव खंडेराव,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश डेहनकर, पो.उपनि. सर्वेश बेलसरे, पो.हवा. दिगांवर रूईकर,सागर कवडे, नापोशि प्रविण सदावर्ते,पोशि निलेश करडे, स्वप्नील निकुरे पोलीस स्टेशन आर्वी व सायबर सेल वर्धा येथील पोशि अक्षय राउत अनुप कावळे यांनी केली.


