
संशईतांना ताब्यात घेऊन सेवाग्राम पोलिसांनी उघड केले तीन घरफोडीचे गुन्हे….
गोपनीय माहीतीच्या आधारे संशईतांना ताब्यात घेऊन सेवाग्राम परीसरातील ३ घरफोडीचे गुन्हे केले उघड,तीन आरोपी ताब्यात….
सेवाग्राम(वर्धा)प्रतिनिधी- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील
फिर्यादी पायल गुलाबराव भोगे रा.अंबरकर ले आऊट वरुड ता.जि.वर्धा यांनी दि.११ फेब्रुवारी रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, त्यांचा भाऊ पराग भोगे हा त्याचे घराला लॉक लावुन परीवारासह बाहेरगावी गेला असतांना अज्ञात चोरट्यांनी दि १० चे रात्रदरम्यान घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला व बेडरूमधील लोखंडी कपाटातुन नगदी रक्कम ५000/- रू., वुलनचे जर्कींन एक सॅमसंग कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल एक नोकीया कंपनीचा साधा छोटा मोबाईल असा एकुण किंमत ११७००/- रु चा मुद्देमाल चोरून नेला अश्या फिर्यादीचे तक्रारीवरुन घरफोडीचा गुन्हा नोंद करून तपास सुरु होता


सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन प्रभारी ठाणेदार तथा परीविक्षधीन पोलिस उपअधिक्षक प्रतिक्षा खेतमाळीस यांनी डि बी पथकास तशा सुचना देऊन डि बी पथकाने पोलिस स्टेशन परीसरात गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती नुसार आरोपी 1)मामुन उर्फ राजा रशिद फारूकी वय 42 वर्ष रा. फारूकी मंजील 13/59 हवालदारपुरा ठाकरे मार्केटजवळ, वर्धा 2) देवाशिश मेघनाथ सरकार वय 41 वर्ष रा. दमदम नागिरबजार, दिल्लीरोड (वेस्ट बंगाल) 3)सम्यक अरूण धवणे वय 19 वर्ष रा. पिपरी(मेघे) ता.जि.वर्धा यांना निष्पन्न करुन ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदरची घरफोडी केल्याचे कबुल केले

त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी करण्याकरीता वापरलेले वाहन, साहीत्य व चोरी केलेले ५०००/- रुपये नगदी, वुलनचे जर्कींन,एक सॅमसंग कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल,एक नोकीया कंपनीचासाधा छोटा मोबाईल जप्त केला तसेच नमुद आरोपीची सखोल चौकशी केली असता त्यांनी मौजा वरूड येथील आणखी दोन घरी घरफोडी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून मोबाईल टॅब, दोन मोबाईल फोन, दोन हँन्ड वॉच, ट्रॉली बॅग, चांदीच्या तोरड्या,जोडवे बेंटेक्सचे हार ,नेकलेस बांगड्या रोख रक्कम २०००/-रू. जप्त करण्यात आली.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात परिविक्षाधिन पोलिस उपअधिक्षक तथा ठाणेदार पोलिस स्टेशन, सेवाग्राम प्रतिक्षा खेतमाळीस यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. विठ्ठल दुधकोहळे पो. हवा. हरिदास काकड, अजय वानखेडे, रमेश वाघ, मंगेश झामरे, सचिन सोनटक्के पो.ना. संजय लाडे, पो.शि. अभय इंगळे, प्रदिप कुचनकर, नेमणुक पोलिस स्टेशन सेवाग्राम यांनी केली.



