
मंदीरातील दानपेटीतुन रक्कम लंपास करणारे सायबर पोलिसांचे जाळ्यात…
मंदीरातून दानपेटीतील रक्कम लंपास करणाऱ्यास सायबर पोलिसांनी नागपुर येथुन घेतले ताब्यात….
खरांगणा(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 21.12.2023 रोजी फिर्यादी श्री. दत्तराज संतराज डोमेग्रामकर रा. कृष्ण मंदिर, तळेगाव रघुजी यांनी पोलिस स्टेशन खरांगणा येथे येऊन तक्रार दिली की, दि,20/12/23 ते दि.21/12/23 चे रात्रदरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने क्रुष्ण मंदीर, मौजा तळेगाव रघुजी, जि. वर्धा येथील मंदिरातील दानपेटी तील नगदी 40000/- रू. चोरुन नेले अशा तक्रारीवरुन पोलिस स्टेशन खरांगणा अप.क्र. 933/2023 कलम 380 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्याचा संमांतर तपास सायबर पोलिस स्टेशन व सायबर सेल करित असतांना तांत्रिक माहितीचे आधारे व गुप्त बातमीदार यांचे कडून मिळालेल्या माहितीनुसार


संदिप उर्फ रोशन उर्फ बबन रमेश वरघट, रा. मरामाय नगर, काटोल, जिल्हा नागपूर

याचा शोध घेवुन ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीस गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता त्याने त्याचे 4 साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातून

1.)नगदी 1965 रू.
2) एक ओप्पो कंपनीचा मोबाईल की. 10000/- रू.
3) एक Samsung कंपनीचा मोबाईल की. 500/- रू.
4) एक स्विफ्ट डिझायर कंपनीची चारचाकी वाहन क्र. MH 04/GD-4316 की 500000/-रु ची जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन ,अपर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कांचन पांडे सायबर पोलिस स्टेशन वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस अंमलदार वैभव कट्टोजवार, दिनेश बोथकर, निलेश तेलरांधे, निलेश कट्टोजवार, कुलदीप टांकसाळे, विशाल मडावी, अमित शुक्ला, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, पवन झाडे, मिना कौरथी, लेखा राठोड, स्मिता महाजन सर्व नेमणूक सायबर वर्धा व वाहन चालक नितीन कांबळे पो.मु.वर्धा यांनी केली.


