
कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणार्यावर सेलु पोलिसांचा छापा…
सेलू पोलिसांची कोंबड्याची झुंज लावुन जुगार खेळणार्यांवर छापा,जुगार कायद्यान्वये कारवाई…..
सेलु(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणाऱ्या लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याच्या सुचना वजा आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रंभारींना दिल्या होत्या त्याअनुषंगाने


दिनांक 03/03/2024 रोजी चे 04.25 वा. दरम्यान गुप्त बातमीदार यांच्याकडून कोंबड बाजार जुगार बाबत मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून ठाणेदार पोस्टे सेलू सपोनी तिरुपती अशोक राणे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनातात पोउपनि प्रीतम निमगडे, पोलिस हवालदार गणेश राऊत, शरद इंगोले ज्ञानदेव वनवे राज तांबारे अनिकेत कोल्हे असे घटनास्थळी पंचासह खाजगी वाहनाने रवाना होऊन मौजा टाकळी किटे येथील धाम नदीच्या काठावर चालू असलेल्या जिवंत कोंबड्यांची झुंज लावून स्वतःच्या फायद्यासाठी पैशाचा हारजितच्या जूगारावर सापळा रचून पंचासमक्ष जुगार रेड केला असता मोक्यावर खालील आरोपी हे जिवंत कोंबड्यांची स्वतःच्या फायद्यासाठी झुंज लावून पैशाचा हारजितचा जुगार खेळताना आरोपी नामे
1) शेख कलिम शेख यासीम, वय-35 वर्ष, रा. विकास चौक सेलू,

2)दिपक पुरुषोत्तम सहारे, वय-25 वर्ष, रा खुर्साबाद(गिरड),

3)वासुदेव सुरेशराव बावणे, वय-38 वर्ष, रा. हिवरा,
4)विजय गणेशराव शिंदे, वय-27 वर्ष, रा. विटाळा, ता. सेलू,
5) रोशन कवडुजी वलके, वय-25 वर्ष, रा.टाकळी किटे,
6) समिर जयरामजी उईके, वय-40 वर्ष, रा.आदर्श कॉलनी वर्धा,
7) चंद्रदिपक रुषिलाल पवार, वय-30 वर्ष, रा. खडकी ता. सेलु,
8)अमरजित मुलासिंग बघोल, वय-34 वर्ष, रा. वानाडोंगरी, हिंगणा,
9) महेश रामलालजी मसराम, वय 70 वर्ष, रा. टाकळी किटे,
10)लक्ष्मण मयुर कैकाडे, वय-38 वर्ष, रा. सातगाव, बुट्टीबोरी,
11)उमेश शालीक मेश्राम, वय-40 वर्षे, रा. सातगाव, बुट्टीबोरी,
12) योगेश लक्ष्मण चिडाम, वय 39 वर्ष, रा. हिगणा, जि.नागपुर,
घटनास्थळावर मिळून आले तसेच पोलिसांना पाहून पळून गेलेले खालील मोटर सायकलचे चालक 13) मो.सा.क्र. MH32AE4563 चा फरार चालक, 14) मो.सा.क्र. MH32AU4456 चा फरार चालक, 15) मो.सा.क्र. MH32AV0417 चा फरार चालक, 16) मो.सा.क्र. MH32H9029 चा फरार चालक, 17) मो.सा.क्र. MH32AU8824 चा फरार चालक, 18) मो.सा. चेसीस नं. ME4JC856LLD073485 चा फरार चालक हे फरार झाल्याने घटनास्थळावर मिळून आलेल्या आरोपी त्यांच्या ताब्यातून नगदी 5000/- रुपये, 2 मृता अवस्थेत व 5 जिवंत कोंबडे किंमत 1400 रुपये, दोन काती, 11 दुचाकी वाहने, 2 चार चाकी वाहने, मोबाईल असा एकूण जुमला किंमत 21,30,500/- रू चा मुद्देमाल मौक्यावर मिळून आल्याने सदर आरोपीता विरुद्ध व फरार आरोपीता विरुद्ध पोस्ट सेलू येथे कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वय कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू, पो उपनि प्रीतम नीमगडे, पोलिस अंमलदार गणेश राऊत, शरद इंगोले, ज्ञानदेव वनवे राज तांबारे अनिकेत कोल्हे लोकेश पवनकर यांनी केली.


