पोर्नोग्राफी साहीत्य ॲानलाईन विकणार्यास वर्धा सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…
चाईल्ड पोर्नोग्राफी साहित्य ऑनलाईन विकणाऱ्या आरोपीस अटक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रीक साधनांचा वापर करून गुन्हे करीत असलेल्या गुन्हेगारांना रंगेहात….
वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की,चाईल्ड पोर्नोग्राफी साहित्य ऑनलाईन विकणाऱ्या आरोपीस अटक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रीक साधनांचा वापर करून गुन्हे करीत असलेल्या गुन्हेगारांना रंगेहात पकडण्याकरीता पोलिस विभाग सुध्दा तांत्रीकदृष्या सबळ झालेला असून सर्व सोशल मिडीया प्लॅटफॅार्मवर लक्ष ठेवण्यात येत असते. त्याकरीता राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोलिस विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या सोशल
मिडीया इंटेलीजंस सेलचे माध्यमातून सोशल मिडीया प्लॅटफॉम्स्चा गैरवापर करणाऱ्या गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यात येते. दिनांक 04.12.2023 रोजी पोलिस अधिक्षक वर्धा नूरुल हसन यांना वूमन सेफ्टी वींग व शी- भरोसा सायबर लॅब, तेलंगाणा यांचे कडून पोलिस स्टेशन पुलगांव हद्यीतील इसम ओम राजेंद्रराव डाहाके हा लहान मूलांचे लैंगीक शोषणासंबंधीचे व्हीडीयो नाईट रायडर नावाचे टेलीग्राम चॅनलवर प्रसारीत करून 100 रूपयामध्ये 2 टी. बी. डाटा विक्री करीत आहे, अशी माहिती प्राप्त झाली. या माहितीवर तात्काळ कारवाई करण्याकरीता सायबर पो.स्टे. चे पो.नि. कांचन पांडे यांना नियूक्त करण्यात आले व तांत्रीक माहिती हस्तगत करण्यात आली. संशयीताचे सर्व सोशल मिडीया अकाऊंट्स, चॅटींग, आय.पी. अॅड्रेस, डीव्हाईस आयडी, फेसबूक अकाऊंट लिंक,
बँक अकाऊंट व यू.पी.आय., ईमेल, फोटो अशी इत्यंभूत माहिती संकलीत करून दिनांक 07.12.2023 रोजी संशयीत ईसम ओम राजेंद्रराव डहाके, वय 23 वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. गाडगे नगर, वार्ड क्रमांक 3, माणीक लेआऊट, नाचणगांव, ता. देवळी, जि. वर्धा, ह.मू. साईनगर, परसोडी रोड, धामणगांव, जि. अमरावती यांस धामणगांव येथून ताब्यात घेण्यात आले.
सदर इसमाजवळ मिळून आलेल्या मोबाईलची प्राथमीक तपासणी केली असता सदर टेलीग्राम चॅनल याच मोबाईलवरून चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याने पो.स्टे. सायबर, जि. वर्धा येथे अप. क्र. 32 / 2023 कलम 67 (ब) माहिती तंत्रज्ञान कायदा (सुधारीत) सन 2008 अन्वये होत गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयात आरोपीकडून 2 मोबाईल हॅन्डसेट कि. 50,000/- रू जप्त करण्यात आले आहे व गुन्हयाचा पूढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक नुरूल हसन व अपर पोलिस अधिक्षक सागर कवडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक कांचन पांडे पो.स्टे. सायबर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात स.पो.नि. संदीप कापडे, पो.हवा. निलेश कट्टोजवार, वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, पो.हवा. कुलदीप टांकसाळे, अनूप राऊत, ना.पो.शि. विशाल मडावी, अक्षय राऊत, गोवींद मुंडे, अमीत शुक्ला, पो. शि. अंकित जिभे, प्रतिक वांदीले, म.पो.शि. स्मिता महाजन, लेखा
राठोड यांचे मदतीने केली.