
अपहरण झालेल्या मुलीस व तिच्या प्रियकरास AHTU पथकाने पुणे येथुन घेतले ताब्यात…
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्यास AHTU च्या पथकाने पुणे येथुन केली अटक…
वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी चंद्रशेखर नरसुजी मांडवकर रा. हनुमान गड, कारला चौक, वर्धा यांनी २६/१/२०२३ रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे तक्रार दिली की ते यातील अल्पवयीन पिडीत मुलगी वय 17 वर्ष व तिची आई- यांचेसह हनुमान गड, कारला चौक, वर्धा येथे राहत असुन त्यांची मुलगी ही शाळेत जात-येत असतांना तिची ओळख वृशाल उर्फ ऋषी राजेश मानकर,वय 26 वर्ष राहणार बल्लाळ लॅान सिंदी मेघे वर्धा याचेशी झाली व त्यांचेमधे निर्माण होऊन त्याने तिच्यशी जवळीक साधली व दि.26.01.2023 रोजी तीला फुस लावून हनुमान गड, कारला चौक, वर्धा येथुन तिच्या पालकांचे कायदेशीर रखवालीतून तिचे अपहरण केले. अशा वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिस स्टेशन रामनगर येथे दि.27.01.2023 रोजी अप क्र-111/ 2023 भादवि कलम 363,370,नुसार गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला होता.
घटनेपासून आरोपी हा अल्पवयीन मुलीला घेऊन फरार होता.त्यांचा शोध न लागल्यामुळे दि.19.12.2023 रोजी सदर गुन्ह्याचा पुढील तपास *अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, (AHTU) वर्धा कडे वर्ग* करण्यात आला होता
सदर गुन्ह्याचे तपासात यातील आरोपी व मुलीचा सातत्याने शोध घेत असतांना, ते दोघेही भिमा कोरेगाव, पुणे परिसरात किरायाची रूम घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली म्हणून त्यांचे शोधार्थ पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशान्वये.09.01.2024 रोजी पुणे येथे पोलिस पथक पाठविण्यात आले. त्यांनी पुणे शहरातील पोलिस स्टेशन लोणीकंद हद्दीतील भिमा कोरेगाव, रामनगर, वढू खुर्द मधे शोध घेतला असता,यातील पिडीत मुलगी व आरोपी हे दोघेही किरायाने रूम घेऊन एकत्र राहत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपास केला असता, यातील आरोपीने अल्पवयीन पिडीत मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे आढळून आल्यामुळे सदर गुन्ह्यात भादवि चे कलम 376(2)(एन ) व 4,6 पोक्सो ऍक्ट चे कलम वाढ करण्यात आली व आरोपीस दिनांक 11/01/2024 रोजी रितसर अटक करून पीडित मुलीसह पुढील तपासकामी पोलिस स्टेशन .रामनगर येथे हस्तांतरीत करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी नूरुल हसन, पोलिस अधीक्षक, वर्धा डॅा सागर कवडे, अपर पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक, स्था. गु. शा, वर्धा, पो. उप नि बालाजी लालपालवाले यांचे मार्गदर्शनात सफौ. निरंजन वरभे,नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे,शबाना शेख ,अनुप कावळे यांनी पार पाडली आहे.




