आर्वी परीसरात विक्री साठी गावठी मोहा दारुची वाहतुक करणारे पोलिसांचे ताब्यात….
गावठी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यावर आर्वी पोलिसांनी कारवाई करत त्यांचे ताब्यातून दोन मोटरसायकल,गावठी मोहा दारूसह एकूण 1,82’800रुपयांचा मुद्देमाल केला….
आर्वी(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(४)रोजी पोलिस स्टेशन आर्वी येथील रोजचे दैनंदिन कार्य संपवुन तसेच रात्र गिनतीनंतर पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे हे आपले कार्यालयात दैनंदिन आढावा घेत असतांना रात्री ११.०० वा चे दरम्यान त्यांचे गुन्हे प्रकटीकरण खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाली की काही ईसम मौजा छिंदवाडी कडून आर्वी कडे मोटर सायकलने गावठी मोहा दारूची वाहतूक करणार आहेत
अशा गोपनीय माहितीवरुन पोलिस निरीक्षक यांनी पथकासह बोरगाव हातला चौक आर्वी येथे नाकाबंदी केली असता एक ईसम मोटारसायकल वर काहीतरी आणतांना दिसला त्यास थांबवुन त्याचे नान विचारले असता त्यांने त्याचे नाव 1)शरद जानराव उईके वय 28 वर्ष रा. लहादेवी, आर्वी ता. आर्वी, जिः वर्धा असे सांगीतले तसेच त्याचे ताब्यातून दोन रबरी ट्यूब मध्ये प्रत्येकी 40 लीटर प्रमाणे एकूण 80 लिटर गावठी मोहा दारू प्रति लिटर 200 रुपये प्रमाणे 16000/- चा व रबरी ट्यूब किंमत 400/₹ एक जुनी वापरते पांढ-या रंगाची टी व्ही एस मोपेड गाडी क्र MH 32 AV 1670 किंमत 80000/- रुपये असा जुमला किंमत 96400/₹ चा माल जप्त करण्यात आला
तसेच त्याच जागी आणखी तिघे मोहा दारुची वाहतुक करतांना मिळुन आले त्यांची नावे अनुक्रमे १) वृषभ भाष्करराव बोराडे वय 30 वर्ष रा. मायाबाई वार्ड आर्वी 2) विनोद गणपतराव नेवारे वय 25 वर्ष रा. मायाबाई वार्ड आर्वी मालक 3) भावेश हिरामण पाटील रा आर्वी पसार दारू देणार 4)नरसिंग उर्फ नरु चव्हाण रा.शिदवाडी ता. तिवसा जि. अमरावती पसार यांचे ताब्यातून दोन रबरी ट्युबमध्ये 80 लिटर गावठी मोहा दारु, प्रती लिटर 200/- रु. प्रमाने 16000/- रु. व एक जुनी वापरती बजाचे कंपनीची डिस्कव्हर मोटर सायकल क्रमांक एम.एच.26/ए.बी./5723 किमंत 70000/- रु. व दोन रबरी ट्युब, प्रती ट्युब 200/-रु. प्रमाने 400/-रु. असा एकुन किमंत 86,400/- रू माल अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने वरील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आलेली आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आर्वी देवराव खंडेराव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे यांचे निदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोहवा अमर हजारे, रामकिसन कासदेकर, दिगंबर रुईकर, नापोशि प्रवीण सदावर्ते पोशि निलेश करडे, स्वप्निल निकुरे, राहुल देशमुख आदींनी केली
,