सहा.पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचा वाळु माफीयांना परत एकदा दणका,४५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सहा.पोलिस अधिक्षक यांचा वाळू माफियांना दणका; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

वर्धा (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उपविभाग पुलगाव आणि देवळी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा अडेगाव चौफुली येथे सापळा रचून वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर, वाळू, मोबाईल असा जवळपास एकूण 45 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अडेगाव चौफुली येथे केलेल्या कारवाईत





1) मारोती बबन वराडे, (वय 42 वर्षे), रा.पार्डी, ता.कळंब, जि.यवतमाळ (अटक)



2)किशोर जानरावजी मडावी, (वय 40 वर्षे), रा.हिवरादरणे ता.कळंब, जि.यवतमाळ (अटक)



3) विलास ज्ञानेश्वर भोयर, (वय 39 वर्षे), रा.शिरपुर होरे, ता.देवळी, जि.वर्धा (अटक)

4)सचिन बाबारावजी दरणे, रा. हिवरा दरणे ता. कळंब जि.यवतमाळ (फरार)

5)चंदन रामदासजी पाटील, (वय 58 वर्षे), रा. शिरपुर होरे ता. देवळी जि. वर्धा (अटक)

6)रविंद्र वसंतराव भानाकर, रा. शिरपुर होरे ता. देवळी, जि.वर्धा (फरार),

7) बाबाराव गणपत चुटे, (वय 58 वर्षे), रा.शिरपुर होरे, ता.देवळी, जि.वर्धा (अटक)

8) विलास मारोतराव फुलमाळी, रा.शिरपुर होरे, ता.देवळी, जि.वर्धा (फरार)

आदींवर अप क्र.  332/24 भादवि कलम 379,34 सह कलम 130,177 मोवाका अंतर्गत देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,आज दि.(28) रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगांव यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात मौजा आडेगाव रोडने पेट्रोलींग करीत असताना मौजा आडेगाव कडुन तीन टीप्पर एकामागे एक येत असताना दिसुन आले असता सदर टिप्पर चालक यांना हात दाखवुन थांबविले आणि तिन्ही चालकांना  विचारपुस केली असता त्यांनी त्या टिप्परमध्ये रेती असल्याचे सांगीतले वरून सदर टिप्परची पंचा समक्ष पाहणी केली असता. त्यामध्ये काळी ओलसर रेती काटोकाट भरून असलेली दिसुन आली असल्याने सदर चालक यांना रॉयलटी, पास परवाना बाबत विचारले असता पास परवाना नसल्याचे सांगीतल्याने सदर रेती (गौण खनीज) ची अवैद्य चोरटी वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने सदर मुद्देमाल  पंचनामा करुन जप्त करण्यात आला तसेच आरोपींचे ताब्यातुन 1) एक टिप्पर क्र.MH 29 BE 6565 ज्यांची किंमत 25,00,000/- रू ज्यामध्ये अंदाजे 05 ब्रास काळी ओलसर रेती कि. 25,000 /- रू 2) एक टिप्पर क्र. MH 29 T 1893 ज्यांची किंमत 10,00,000/- रू ज्यामध्ये अंदाजे 05 ब्रास काळी ओलसर रेती कि. 20,000 /- रू 3) एक टिप्पर क्र. MH 29 T 1496 ज्यांची किंमत 10,00,000/- रू ज्यामध्ये अंदाजे 05 ब्रास काळी ओलसर रेती कि. 20,000 /- रू 4) नोकीया कंपनीचे 02 किपॅड मोबाईल प्रत्येकी किंमत 1000 रू प्रमाणे 2,000 रू 5) एक ओप्पो कंपनीचा ॲन्ड्राईड मोबाईल किंमत 10,000 /- रू 6) एक कार्बन कंपनीचा मोबाईल किंमत 1,000 /- रू 7) एक रेडमी कंपनीचा ॲन्ड्राईड मोबाईल किंमत 7,000 /- रू असा एकुण जुमला किंमत 45,85,000 /- रूपये चा मुद्देमाल हा जप्त करून सदर गुन्हयातील आरोपींना अटक करून त्यांना पोलिस स्टेशन देवळी येथे पोलिस कस्टडी रिमांड मध्ये ठेवण्यात आले आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा राजु कुरसंगे, पो.शि सागर पवार पोलीस स्टेशन देवळी हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, सहा.पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण, उप विभाग पुलगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन देवळी येथील पोलिस निरीक्षक सार्थक प्र.नेहेते, सफौ.किशोर साखरे, पोहवा धनंजय किटे, प्रणय इंगोले, शुभम कावडे, मनोज नप्ते आणि सलिम शेख यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!