शेअर खरेदी विक्रीच्या नावाखाली आर्थिक फसवनुक करणारे वर्धा सायबर पोलिसांनी नाशिक येथुन घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

शेअर मार्केटच्या नावाखाली ४० लक्ष रु ची फसवणुक करणारे वर्धा सायबर पोलिसांनी नाशिक येथुन घेतले ताब्यात….

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी(नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) यांना दि.(०६) जुन २०२४ रोजी श्रुती कुमारी नावाचे महिलेने Interactive brokars official TMLD या ग्रुप मध्ये फिर्यादींचा मोबाईल नंबर अॅड केला. सदर ग्रुपमध्ये ट्रेडींगवर झालेल्या नफा संबंधात संदेश पाठवित होते. त्यानंतर फिर्यादींना @SOPHIA SMITH9999 व @IB88889999 व्दारे ट्रेडींगचे मॅसेज आले. त्यावरील मॅसेज फिर्यादीनां योग्य वाटल्याने शेअर ट्रेडींगकरीता IB नावाचे अॅप डाउनलोड केले व ॲप व्दारे वेगवेगळया कंपनीचे शेअर खरेदी करुन गुंतवणुक करण्यास सुरूवात केली. शेअर खरेदी करण्याकरीता ऑनलाईन व आर. टी. जि.एस.व्दारे ४०,१०,०००/- रू गुंतविले. त्यावर १,८२,४७,९१६.८७ /- रू चा नफा दिसत असल्याने शेअर विक्री करण्याचा प्रयत्न केला असता ते विकता आले नाही





त्यामुळे ग्रुप अॅडमीन श्रुतीकुमारी यांचे मोबाईल क्रमांकावर. व ग्रुप मधील इंन्स्ट्रक्टर विल्यम अल्फेड याचे मोबाईल क्रमांकावर फिर्यादी यांनी संपर्क केला असता शेअर विक्री करीता ५६,९५,०००/- रू. टॅक्स भरावे लागतील असे सांगितले. त्यावेळी फिर्यादींना त्यांची फसवणुक झाल्याचे निदर्शनास आले. याप्रमाणे ४०,१०,००० /- रू ची ऑनलाईन फसवणुक झाल्याचे कळताच
फिर्यादीचे तक्रारीवरून सायबर पोलिस स्टेशन वर्धा येथे ३३/२०२४ कलम ३१८ (४), ३१९ (२) बी.एन.एस.सह कलम ६६ (ड) माहीती तंत्रज्ञान कायदा सदरचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला



सदर गुन्हयात तांत्रीक विश्लेषणावरून फिर्यादींची फसवणुक झालेल्या रकमेपैकी २०,००,००० /- रू साई ट्रेडर्स, नावाचे एस. बी. आय. बँक खाते धारक खाते सचिन विजय सिंह, रा. अंबड, नाशिक या खात्यात वळते झाल्याचे निष्पन्न झाले व आरोपी गुरूदत्त निरज श्रीवास्तव यांनी संगणमत करून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी ०१) सचिन विजय सिंह, वय २६ वर्षे ०२) गुरूदत्त निरज श्रीवास्तव, वय २२ वर्षे, रा. नाशिक यांना दि. २७.०७.२०२४ रोजी नाशिक येथुन गुन्हयात अटक करण्यात आली आरोपींचे
ताब्यातुन गुन्हा करण्यास वापरलेले २ लॅपटॉप, २ मोबाईल, १ इंटरनेट राउटर, २ स्वाईप मशीन, १६ क्रेडीट/डेबीट व ७ चेकबुक, १ पासबुक, आधार कार्ड ४२, पॅनकार्ड २३, इंटरनेट बॅकींगचे  पासवर्डचे पत्र, ४ महाराष्ट्र दुकाण / आस्थापना लायसन्स याप्रमाणे एकुण की. ८०,३००/- रू मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपीस दि. ०८.०८.२०२४ पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मध्ये आहे व गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरूल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सायबर पोलिस स्टेशन महेश चव्हाण,सहा पोलिस निरीक्षक गणेश बैरागी, (पो.स्टे. वर्धा शहर) पो.हवा. विशाल मडावी, अनुप कावळे, निलेश तेलरांधे, अनुप राऊत, अमित शुक्ला, रणजित जाधव, वैभव कट्टोजवार, अक्षय राऊत, दिनेश बोथकर.अंकीत जिभे, पवन झाडे, लेखा राठोड, प्रतिक वांदीले, यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!