अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले घरफोडीचे ११ गुन्हे….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन जिल्हयातील ०७ घरफोडीचे  तसेच नजीकच्या जिल्हयातील अमरावती ०२ चंद्रपुर ०२ असे एकुण ११ घरफोडीचे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने उघड करुन आरोपीकडुन गुन्हयातील ८,७१, ३६४/- रू. चा मुद्देमाल केला जप्त…

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १२ मार्च २०२५ यातील फिर्यादी सौ. माया सुरेश मुंजेवार रा. वार्ड क्र ०३, जाम ता. समुद्रपुर जि. वर्धा यांनी पो. स्टे. समुद्रपुर येथे तक्रार दिली की त्या रोजी मजुरीचे कामाला गेले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे घराचे व बेडरूमचे लॉक तोडुन बेडरूमधील आलमारी मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे व नगदी रूपये चोरून नेल्याने पो.स्टे. समुद्रपुर येथील गुन्हा दाखल करण्यात आला होता





त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखा व समुद्रपुर पोलिस करीत होती त्यानुसार जिल्हयात घडलेल्या घरफोडी व चोरीचे दाखल गुन्हे संबंधाने वर्धा शहर परीसरात पेट्रोलींग दरम्यान गुन्हेगार चेक करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, एक ईसम हा बजाज चौक, रेल्वे उडान पुलाचे खाली बसुन असुन त्याच्या हालचाली संशयास्पद आहे, अश्या खबरेप्रमाणे पो. स्टॉफ चे मदतीने सापळा रचुन घेराव टाकुण सदर ईसमाला मोठया शिताफिने ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रविण विनायकराव आक्केवार, वय ५६ वर्ष, रा. एकोरी वार्ड, क्रं. ०२, श्री टाकीजचौक, चंद्रपुर, असे सांगीतले. पंचासमक्ष त्याचे अंगझडती व ताब्यातुन १) एक सोन्याची अंगठी व वेगवेगळ्या आकाराचे सोन्याचे १०२ ग्रॅम रवे, एकुण १०५.८३० ग्रॅम किमंत ८,१२,२६४/- रू. २) एक चांदीचा शिक्का १० ग्रॅम किंमत १,०००/-रू, ४) नगदी ३८,०००/- रू भारतीय चलनाच्या नोटा २) एक अॅडाईड मोबाईल किमंत २०,०००/- रू., ३) दोन लोखंडी सळाखीची घरफोडी करण्याकरीता वापरण्यात येणारी अवजारे किमंत १००/- रू, ६) एक चाबीचा गुच्छा व एक ईलेक्ट्रोनीक पॉकीट वनजकाटा असा एकुण जु. कि. ८,७१,३६४/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



सदर गुन्हयातील आरोपीस सखोल विचारपुस केली असता त्याने वर्धा जिल्हयातील पो.स्टे. समुद्रपुर, पुलगांव, हिंगणघाट, सेवाग्राम, सावंगी मेघे, तसेच अमरावती जिल्हयातील पो.स्टे. गाडगेनगर, जिल्हा चंद्रपुर येथील पो.स्टे. वरोरा अश्या परीसरात बंद घराचे लॉक तोडून एकुण ११ ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगुन सदरचा मुद्देमाल हा त्याच गुन्हयातील असल्याची कबुली दिल्याने त्याला पोलिस स्टेशन समुद्रपुर अपराध क्रमांक २२६/२०२५ कलम ३३१(३), ३०५ (ब) भा.न्या.सं., मध्ये गुन्हयाचे पुढील तपासकामी अटक करण्यात आली आहे.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक. अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि. बालाजी लालपालवाले, पोहवा गजानन लामसे,पोलिस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनीष कांबळे, गोपाल बावणकर, अमोल नगराळे, मंगेश आदे, दिपक साठे, प्रफुल पुनवटकर, अलका कुंभलवार सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!