
डोडाणी चौक येथील फिल्मी स्टाईल जबरी चोरीचा सेवाग्राम पोलिसांनी काही तासाचे आत केला उलगडा,आरोपी ताब्यात…
फिल्मी स्टाईल जबरी चोरीचा सेवाग्राम पोलिसांनी १० तासाचे आत केला उलगडा,विधिसंघर्षित बालकांसह तिघे आरोपी मुद्देमालासह ताब्यात…..
सेवाग्राम(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२७)ॲागस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ७.३० वा चे सुमारास यातील फिर्यादी शुभम कमलाकर गेडेकार, वय 28 वर्ष, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट, ता. हिंगणघाट, जि. वर्धा हा त्याचा विधी संघर्षीत बालक मित्र व त्याच्या मैत्रीणीसह फिर्यादीचे मालकीची डस्टन रेडी-गो कार क्र. एमएच-31-एफए-1186 ने नागपुर येथुन कपडे खरेदी करुन यातील विधी संघर्षीत बालकास मसाळा, वर्धा येथील त्याच्या आजीच्या घरी सोडुन देण्याकरीता डोडाणी चौकातुन सेवाग्राम रेल्वे पुलाकडे येणाऱ्या नविन यायपास रोडने येत असताना, विधि संघर्षीत बालकास उलटी आल्या सारखे वाटत असल्याने त्याने फिर्यादीला कार थांबविण्यास सांगीतले तर फिर्यादीने त्याची कार रोडचे बाजुने उभी करुन सदर बालक. उलटी करण्याकरीता कारमधुन उतरला व फिर्यादी हा कारमधेच ड्रायव्हींग सिटवर बसुन असताना, एक इसम फिर्यादीचे कारजवळ येवुन कारचे गेट उघडुन फिर्यादीच्या पोटाला त्याचेजवळील चाकु लावुन कारची चाबी काढुन घेतली व दुसऱ्या इसमाने कारचे साईडचे मागील बाजुचे गेट उघडुन कारमध्ये त्याचे जवळील चाकु फिर्यादीच्या गळयाला लावला व पहील्या इसमाने दुसन्या इसमास टाक रे चाकु, हा जारत फडफड करुन राहीला. असे म्हटले असता, दुसऱ्या इसमाने त्याचे दुसन्या हाताने फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशामध्ये हात टाकुन खिशातील 1) नगदी रु. 50,000/- 2) एक पॉकेट ज्यामध्ये फिर्यादीचे स्वतःचे, भावाचे व वडीलांचे मिळुन वेगवेगळया बँकेचे एकुण 9 एटीएम कार्ड, 3 क्रेडीट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड व डस्टन रेडी-गो कार क्र. एमएच-31-एफए-1186 वे आर.सी. कार्ड कि. 00/- 3) कारमध्ये ठेवुन असलेले तिन जुने वापरते अॅन्ड्रॉईड मोबाईल एकुण कि. रु. 18,000/- असा एकुण जु.कि. रु. 68,000/-रु. चा मुद्देमाल जबरीने हिसकावुन व फिर्यादीस चाकुने जखमी करुन ते दोघेही अनोळखी इसम कारमधुन उतरुन कारसमोर मोटर सायकल घेवुन उभ्या असलेल्या इसमाच्या मोटर सायकलवर बसुन ट्रिपल सिट पळुन गेले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन पो.स्टे. सेवाग्राम येथे अप. क्र. 661/2024 कलम 309 (6), 35(3) भारतीय न्याय संहिता -2023 अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता


सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरचा गुन्हा उघडकिस आणण्यासाठी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणण्यासाठीच्या सुचना सपोनि विनीत घागे यांना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने सदर गुन्हयाच्या तपासात फिर्यादी शुभमसोबत असलेला विधी संघर्षीत बालकास सदर गुन्हयाबाबत सखोल विचारपुस केली असता, त्याने सांगीतले की, फिर्यादी शुभम हा विधिसंघर्षित बालकाची आजी मसाळा येथे राहत असुन फिर्यादी हा त्यांचे घराशेजारी राहतो व प्रॉपर्टी डिलींगचा व्यवसाय करतो.विधीसंघर्षित बालक याचे आईवडील हिंगणघाट येथे राहत असुन तो एक वर्षापासुन त्याचे आजीकडे मसाळा वर्धा येथे राहत असुन तो जे.ई.ई. च्या ट्युशन क्लास करीता रामनगर, वर्धा येथे जातो

त्यादरम्यान त्याची ओळख आरोपी क्र. 1 विधान उर्फ ओम विजय निवल, वय 21 वर्ष, रा. भिवापुर, ता. जि. वर्धा ह.मु. रमेश वाघमारे यांचे घरी किरायाने, रामनगर, वर्धा याचेसोबत झाली.15 दिवसापुर्वी ओम निवल हा त्याचा मित्र आरोपी क्र. 2 तौसीफ हबीब बेग, वय 22 वर्ष, रा. हनुमान नगर, वर्धा याचेसह विधिसंघर्षित बालक याचे आजीचे घरी मसाळा येथे आला व त्यावेळेस आरोपी क्र १ ची बर्गमॅन मोपेड गहाण ठेवलेली असल्याने ती सोडविण्याकरीता त्याला पैशाची गरज आहे. यावरुन विधी संघर्षीत बालकाने ने आरोपी क्र. 1 व 2 यांना सांगीतले की, फिर्यादी शुभम यास मुलीचा नाद असुन त्याचेजवळ नेहमी रु. 40,000-50,000/- असतात. त्यावरुन त्यांनी विधि संघर्षीत बालकाला ला फिर्यादी शुभम याला वर्धेला बोलाव आपण त्याला लुटुन व त्याचेजवळील पैसे घेवु असे सांगून त्याने त्याची मैत्रीणीची लालच द्यायला सांगीतले.

त्यावरुन विधि संघर्षीत बालक या ने फिर्यादीला फोन करुन माझी मैत्रीण सोबत असल्याचे सांगुनं ती नागपुर येथे शिक्षण घेत आहे. तिला नागपुर येथे फिरवुन सेवाग्राम येथे सोडणे आहे. त्यावर फिर्यादी तयार झाला नमुद तारखेला विधि संघर्षीत बालका सोबत त्याचे कारने नागपुरला गेला. तिथे आरोपी क्र. 1 ची मैत्रीण भेटली. तिला फिर्यादीने कपडे खरेदी करुन दिले. आरोपी क्र. 1 याने विधीसंघर्षित बालकाला. फिर्यादीला सोबत घेवुन वर्धा येथे घेवुन येण्यास सांगीतले. त्यावरुन त्या ने आरोपी क्र.1 ने सांगीतल्याप्रमाणे घटनेच्यावेळी फिर्यादी शुभम व सोबत असलेल्या मुलीसह फिर्यादीचे कारने नागपुर येथुन डोडाणी चौक, वर्धा येथे येवुन सेवाग्राम कडे येणाऱ्या नविन बायपास रोडने येत असताना, सदर वि बालकाने उलटी आल्याचे नाटक करुन फिर्यादीला कार थांबविण्यास सांगीतले व फिर्यादीने कार थांबविली असता, ठरल्याप्रमाणे घटनास्थळी आधीच लपुन थांबुन असलेले आरोपी क्र. 1, 2 व 3 जुनेद खान अय्याड़ा खान, वय 21 वर्ष, रा. शिवनगर, वर्धा यांनी फिर्यादी शुभम यास चाकूचा धाक दाखवुन व त्याला जखमी करुन त्याचेजवळील वर नमुद मुद्देमाल व नगदी असा एकुण 68,000/- चा माल जबरीने हिसकावुन पळुन गेल्याचे कबुल केले वरून नमुद गुन्हयात आरोपी क्र. 1, 2 व 3 यांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडून गुन्हयातील आरोपींनी जबरीने हिसकावुन नेलेली काही रक्कम व एक हत्यार जप्त करण्यात आलेले आहे गुन्हयाचा तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, वर्धा प्रमोद मकेश्वर पो.नि. स्था.गु.शा. विनोद चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार स.पो.नि. विनित घागे, पो.उप.नि. संतोष चव्हाण, पो.हवा. हरीदास काकड, सचिन सोनटक्के, मंगेश झांबरे, नापोशि गजानन कठाणे,पोशि अभय इंगळे,मपोशि वैशाली करमणकर तसेच चापोहवा विलास लोहकरे यानी केली


