महामार्गावर दरोडा घालणारी टोळी गुन्हे शाखेने केली जेरबंद,अनेक गुन्हे होणार उघड….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

महामार्गावर दरोडा घालणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,तींन गंभीर गुन्हे केले उघड…

पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी मोहम्मद अजिम मोहम्मद हाशम शेख. वय 42 वर्ष, रा. रेहमतनगर, अमरावती, हे दि(06) सप्टेबर 2024 रोजी जि. भंडारा येथून डेपोची रेती त्यांचे ट्रक कमांक एम एच 12 आर एन 7784 मध्ये भरून वर्धा पुलगाव मार्गे अमरावती कडे त्यांचा सहकारी डायव्हरसह जात असतांना दि(07) सप्टेबर 2024 रोजी रात्री 12.15 वाजताचे दरम्यान नागपुर औरंगाबाद राज्य महामार्गाने जात असतांना पुलगावचे अलीकडे कवठा रेल्वे गावाजवळ ट्रकचे लाईटचे उजेडात रोडवर जॅक दिसल्याने ट्रक थांबविला असता ट्रकसमोर अनोळखी 22 ते 25 वयोगटातील काही ईसम हातात काठ्या घेवुन आले व ट्रक बंद केला त्या अनोळखी ईसमानी फिर्यादीला व सोबतचे चालकास खाली उत्तखुन रोडच्या बाजुला शेतात नेवून काठयांनी मारहान करून त्याचे जवळील एक वियो कंपनीचा मोबाईल किंमत 20,000 रूपये सोबतचे चालकाचे खिशातील 5,500/- रूपये, जबरीने हिसकावुन घेवुन ट्रकचे डिझेल टॅकचे लॉक तोडुन ट्रकचे टॅकमधिल अंदाजे 100 लिटर डिझेल किमंत 9,300/- असा एकुण 34,800/- रू चा मुददेमाल जबरीने हिसकावून नेल्याचे फिर्यादीचे तकारीवरून पोलिस स्टेशन पुलगाव येथे अपराध क्रमांक 736/2024 कलम 310 (2) 311 भारतीय न्याय सहिता सन 2023 अन्वये गंभीर स्वरूपाचा दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला





सदर घडलेल्या दरोडयाच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हयाचे गार्भीर्य ओळखुन पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना तपासकामी मार्गदर्शन करून सदर गुन्हा उघडकिस आणण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  विनोद चौधरी यांनी गुन्हे शाखेतील तपास पथकांसोबत घटनास्थळी जावुन घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता सदर घटनास्थळावर आरोपींनी डिझेल भरलेल्या व रिकाम्या प्लास्टीकच्या कॅन सोडलेल्या असल्याने सदर कॅनचे उत्पादनाबाबत माहिती घेतली असता त्याचे उत्पादन जिल्हा उस्मानाबाद येथील असल्याचे दिसुन आल्याने त्या परीसरात अश्या प्रकारचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार यांची माहिती घेण्यात आली. घटनास्थळावर फिंगर प्रिंन्ट एक्सपर्ट, डोंग स्कॉड, पथक, फुटप्रीन्ट हँडलर यांना बोलविण्यात आले तसेच रोडलगत असलेल्या पेट्रोलपंप, धाबे येथील सिसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले. अश्या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचे फोटो अल्बम फिर्यादी व त्याचा सह चालक याला दाखविले.



सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना जि. अमरावती पो. स्टे. तळेगाव (दशासर) हद्दीत सुध्दा दिनांक 05/09/2024 व दिनांक 06/09/2024 चे रात्री अश्याच प्रकारचे दरोडयाचे गुन्हे घडल्याची माहिती मिळाल्याने तेथेसुध्दा घटनास्थळी जावुन पाहणी केली व फिर्यादी ओम गणेश राउत, वय 28 वर्ष, रा. पाराभवानी ता. बारशी टाकळी जि. अकोला याला विचारपुस केली असता दिनांक 05/09/2024 चे रात्री तो पिकअप गाडीने मालक आशिष याचेसह नागपुर उमरेड येथे माल घेवुन जाण्यास कारंजा लाड मार्गे अंदाजे रात्री 11.30 वाजताचे दरम्यान देवगाव ते पुलगाव रोडनी जात असतांना रोडवर एक मोटरसायकल रोडलगत पडुन व 02 माणसे पडलेली दिसली, त्याला रोडवर अपघात झाला आहे असे वाटल्याने त्याने त्याची पीकअप गाडी थांबवुन रोडवर पडलेल्या ईसमांजवळ गेला असता पाठीमागुन अज्ञात ईसमांनी त्यांना काठीने मारहान करून त्याचे मोबाईल फोन व नगदी पैसे जबरीने हिसकावून पळून गेले.



वरील प्रमाणे घडलेल्या तिन्ही गुन्हयाचे बारकाईने अवलोकन करून तपास केला असता अश्या प्रकारचे गुन्हे करणारी टोळी उस्मानाबाद जिल्हयातील सकीय असल्याचे आढळून आले. तसेच घटनास्थळावरील प्लास्टीक कॅन देखील जिल्हा उस्मानाबाद येथील असल्याचे दिसुन आल्याने अश्या प्रकारे गुन्हे करणा-या गुन्हेगारांची माहिती गोपनीय रित्या संकलित केली त्याचा तांत्रीक तपास केला असता तांत्रीक तपासामध्ये जिल्हा उस्मानाबाद येथील गुन्हेगाराचे घटनेवेळी सदर परीसरात वास्तव्य असल्याचे दिसुन आले. त्यांचा शोध सुरू केला असता नमुद ईसम हे गोंदिया परीसरात असल्याचे तांत्रीक तपासात दिसुन आले. तात्काळ वेगवेगळी 03 पथके तयार करून आरोपींचे शोध घेण्याकरीता  रवाना केले त्यांनी हायवे रोडवरील टोलनाके चेक करून आरोपींचा माग काढत असतांना नमुद आरोपी ईसम हे नॅशनल हायवे ने महाराष्ट्र बॉर्डर पार करून छत्तीसगड राज्यात पोहचल्याचे निष्पन्न झाले. सलग पाठलाग करून तपास पथकांनी राजनादंगाव जवळ संशईत असलेल्या ईसमांची 02 ट्रक वाहने निष्पन्न करून त्यांचे हालचालीवर बारकाईने पाळत ठेवून असतांना दोन्ही वाहनांमध्ये 08 ते 09 ईसम असल्याचे लक्षात आले. पथकांनी दोन्ही वाहनांवरती टॅ्प लावुन वाहनांतील ईसमांना घेराव टाकुन पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिस असल्याचा संशय आल्याने त्यांनी वाहने जागीच उभी करून वाहनातुन उड्या मारून शेतात व जंगलाचे बाजुने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जागीच 04 इसमांना पकडण्यात आले व 05 ईसमांचा शेतात 02 किमी पाठलाग करून शिताफीने जिवाची पर्वा न करता रात्रीचे अंधारात पाठलाग करून पकडले त्यापैकी दोन ईसमांनी नदी नाल्यात रात्रीचे वेळी उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील जिवाची बाजी लावुन शिताफिने पकडले.

सर्व आरोपींना सुरक्षित ताब्यात घेऊन गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी पुलगाव रोडवर ट्रकचालकास लुटले व देवगाव रोडवर सिलेंडर भरलेल्या ट्रक चालक व पिकअप चालक यांना लुटल्याची माहिती दिली. त्यावरून आरोपी भैय्या आबा काळे, वय 24 वर्ष, रा. खामकर वाडी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद 2) बबलु मोहन शिंदे, वय 24 वर्ष, रा. ईटकुर ता. कळंब, जि. उस्मानाबाद 3) मधुकर आबा काळे, वय 25 वर्ष, रा. खामकर वाडी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद, 4) सचिन बबरू काळे वय 23 वर्ष, रा. इंदापुर ता. वाशी, जि. उस्मानाबाद, 5) किरण महादेव काळे, वय 19 वर्ष, रा. अंदोरा ता. कळंब, जि. उस्मानाबाद 6) गोविंद तात्या पवार, वय 18 वर्ष, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद,7) अनिल शिवाजी काळे, वय 24 वर्ष, रा. दसने, ता. वाशी, जि. उस्मानाबाद आणि दोन विधी संघर्षीत बालकासह 08 ईसमांना ताब्यात घेण्यात आले.

वरील सर्व आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे ताब्यातुन 10 मोबाईल फोन, नगदी पैसे व गुन्हा करतांना गुन्हयात वापरलेली वाहने ट्रक कमांक एम एच. 23 ए. यु 9299 व ट्रक क्र एम. एच. 23 ए यु. 9799 असा एकूण 91,11,270 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.वरील सर्व आरोपी हे उस्मानाबाद जिल्हयातील खामकरवाडी येथील अटटल गुन्हेगार असुन त्याचा पुर्व ईतिहास पाहता आरोपी हे दरोडा, चोरी, जबरी चोरी करण्याचे सवईचे असल्याचे दिसुन आले आहे त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव  राहुल चव्हान, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी,सहा पोलिस निरीक्षक सायबर शाखा, राजेश पाटील पोहवा  हमीद शेख, गजानन लामसे, शेखर डोगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रितेश शर्मा, रामकिसन ईप्पर, संघसेन कांबळे, गोपाल बावणकर, विकास मुंढे, अरविंद इंगोले, मिथुन जिचकार, मंगेश आदे, दिपक साठे, चालक पोउपनि शिवकुमार परदेशी सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तसेच पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, अक्षय राउत, अकिंत जिभे, सायबर सेल वर्धा यांनी केली गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!