संशयीत ईसमास ताब्यात घेऊन सावंगी (मेघे) पोलिसांनी मोटर सायकल चोरीचा गुन्हा केला उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

संशयीत ईसमास ताब्यात घेऊन सावंगी (मेघे) पोलिसांनी मोटर सायकल चोरीचा गुन्हा केला उघड…

सावंगी(मेघे)वर्धा – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी रविकांत मनोहरलाल कोटक, वय 47 वर्ष रा. दावत हॉटेल जवळ,
रावत रेसिंडसी बिल्डींग, सावंगी मेघे ता.जि. वर्धा यांचे राहते घराचे बाजुला त्यांची मोटर सायकल हिरो होंडा स्प्लेंडर कं. एम.एच. 32 एच 3041 काळया निळया रंगाची अंदाजे किं. 20,000/- रू. ची ठेवली असता दि(२२)जुन रोजी 11.30 वा. ते दि(२३) जुन चे सकाळी 09.30 वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली अशा फिर्यादीच्या तक्रारीवरुन वरुन पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे अप क. 429/24 कलम 379 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता व  तपास सुरु होता





सदर गुन्हा दाखल होताच आरोपी व मुद्देमालाचे शोधार्थ पोलिस पथक गेले असता,गोपनीय माहीती मिळाली कि, एक संशयीत इसम याने दिनांक 23/06/2024 रोजीपासुन एक मोटर सायकल कोठुन तरी चोरून आणलेली असुन तो हल्ली शिखबेडा सावंगी मेघे येथील स्मशानभुमीवरील बसण्याचे बेंचवर झोपुन आहे व चोरलेली गाडी सुध्दा तेथेच आहे.



अशा मिळालेल्या माहितीवरून सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता एक इसम व मोटर सायकल मिळून आल्याने त्याठिकाणी हजर मिळून आलेल्या इसमास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अर्जुनसिंग सिंकदरसिंग बावरी, वय 27 वर्ष रा. शिखबेडा, तळेगांव शा पंत ता.आर्वी, जि.वर्धा असे सांगितले त्यांचे ताब्यात असलेल्या नमुद वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली व त्यास विशावासात घेवुनविचारपुस केली असता, त्याने सदरची मोटर सायकल सावंगी मेघे परीसरातुन चोरल्याचे कबुल केले.सदरची मोटर सायकल कि 20,000/ रु चा माल जप्त करण्यात आला.



सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेष्वर, यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस
निरीक्षक संदिप कापडे ठाणेदार, पोलिस स्टेशन सावंगी (मेघे). यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अंमलदार पोहवा सतीश दरवरे, निलेश सडमाके, अनिल वैद्य, नापोशि
स्वप्नील मोरे, पोशि निखील फुटाणे, अमोल जाधव सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!