
शेतातील शेतपंप चोरी करणारा अट्टल चोरटा पुलगाव पोलिसांचे ताब्यात…
परीसरातील शेतातील मोटार पंप चोरी करणारा अट्टल चोरटा पुलगाव पोलीसांच्या जाळ्यात….


पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पुलगाव परीसरातील मौजा आकोली केळापुर विजयगोपाल, कवठा(झोपडी) शेत शिवारातील विहीरीतील तसेच नाल्या वरील पाण्याच्या मोटरपंप चोरी गेल्याच्या बऱ्याच तक्रारी पोलिस स्टेशन पुलगाव येथे प्राप्त झाल्या होत्या त्याअनुषंगाने सहा पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचे आदेशाने पुलगाव पोलीसांनी शोध मोहीम राबवीली होती

त्यानुसार दिनांक. 05/12/2024 रोजी रात्री 11.00 वा. चे दरम्यान खबरीमार्फत गोपनीय माहीती मिळाली की मौजा हिवरा (कावरे) शेत शिवारात एक स्कॅार्पियो गाडी संशईतरित्या फिरत आहे अशा माहीतीवरुन सदर स्कार्पीओ गाडीला अटकाव करुन गाडी चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजपाल शंकर नगराळे रा. बोरगाव(मादणी) ता.जि. यवतमाळ असे सांगितले

सदर गाडीची तपासनी केली असता दोन मोटरपंप मिळुन आल्याने त्यास ईतर चोरी गेलेल्या मोटरपंपा बाबत विचारणा केली असता त्याने एकुण 12 मोटर पंप चोरी केल्याचे सांगितले त्याचे पासुन एकुण 12 सबमर्सीबल मोटर पंप व 14 नोजप स्पींकलर व एक फोर व्हीलर स्काँरपीओ असा एकुण कींमत 764000/- रु चा माल हस्तगत करण्यात आला
सदर प्रकरणी पोलिस स्टेशन पुलगाव येथे मोटर पंप चोरी गेल्याचे एकुण 6 गुन्हे नोंद आहे अप. क्रमांक 1) 947/24 कलम 303(2) बी.एन.एस. 2) 995/24 कलम 303(2) बी.एन.एस. 3) 1002/24 कलम 303(2) बी.एन.एस. 4) 891/24 कलम 303(2) बी.एन.एस. 5) 802/24 कलम 303(2) बी.एन.एस. 6) 902/24 कलम 303(2) बी.एन.एस. या गुन्हयामधील संपुर्ण चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीची अधिक चौकशमुद्देमाल मिळुन आलेल्या शेतकऱ्यांची नावे 1. ज्ञानेश्वर नामदेव शिरभाते रा. अकोली 2. गजानन शिरभाते रा. अकोली 3. गोविंदा सोनवणे रा. अकोली 4. वेंकटेश दंडमुंडी रा. चोंडी 5. दिगंबर राजेंद्र झोपाटे रा. विजय गोपाल 6. स्वप्निल दिलीप झोरे रा.विजयगोपाल 7. आकाश रामकृष्ण वानखेडे रा. विजय गोपाल 8. परीक्षित श्रीचंद राठोड रा. साईनगर देवळी 9. हरिभाऊ विठोबाची डगवार रा. विजय गोपाल 10. शरद नामदेव काळे रा.जिजामाता कॉलनी पुलगाव 11. भूषण विनायक आकडे रा. कवठा झोपडी
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक ड़ॉ,सागर रतनकुमार कवडे,.सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव राहुल चव्हाण, पोलिस स्टेशन पुलगाव ठाणेदार राहुल सोनवणे यांचे मार्गदर्शनात डिबी पथकाचे चंद्रशेखर चुटे, अमोल जिंदे, रवींद्र जुगनाके, रितेश गुजर, ओमप्रकाश तल्लारी, विश्वजीत वानखेडे, सायबर सेलचे अक्षय राऊत, सैनिक होमगार्ड श्याम जनबंधू यांनी केले


