गर्दिचा फायदा घेऊन बसस्थानकावर चोरी करणारी महीला हिंगणघाट डी बी पथकाने केली जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेवून दागिने व पैसे चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलीसांचे जाळयात….

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी  श्रीमती वच्छला गोपालराव बोरधरे वय 65 वर्ष रा.वार्ड क्र.06 बुटटीबोरी जि.नागपुर यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार  दिली की त्या दि. 14/04/2025 चे 11.30 वा दरम्यान वाढदिवसाकरीता बुटटीबोरी येथुन हिंगणघाट येथे येत असताना हिंगणघाट येथील नंदोरी चौकात बसमधुन उतरत असताना तिला बॅगमधे असलेले दोन लहान पर्समधील 1)सोन्याची पोत अंदाजे 03 तोळे वजनाची कि 2,10,000रू 2)तीन तोळे सोन्याचा पोहेहार कि.2,10,000 रू.3) रोख 5000 रू. एकुन.4,25,000/रू.दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले. अशा फिर्यादीचे  रिपोर्ट वरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता





असून सदर गुन्हयांतील आरोपीचा शोध घेण्याकरीता पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकुर यांचे आदेशाने डी बी पथक त्याचे पथकासह फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाचे बाईचा पोस्टे परिसरात पेट्रेलिंग करीत असता शोध घेतला असता नंदोरी चौक, हिंगणघाट येथे एक महिला लहान मुलांसह संशयीत रित्या फिरतांनी मिळून आली तिला महिला पोलीस अंमलदार सुषमा कावळे हिचे मदतीने ताब्यात घेवून तिला तिचे नाव, पत्ता विचारले असता तिने तिचे नाव सौ. दिपा अनिल लोंढे वय 23 वर्ष रा. रहाटे नगर टोली, व्हीटीस पार्वती नगर, पोस्ट पार्वती नगर, ता. जि. नागपूर असे सांगितल्याने तिला ताब्यात घेवून तिचे जवळ असलेल्या हॅन्डबॅगची पाहणी केली असता तिचे हॅन्डबॅग मध्ये हिरव्या रंगाचे छोटी कापडी पिशवी मिळून आल्याने पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये 1) एक पिवळसर धातू असलेली अंदाजे 3 तोळयाची पोत ज्याच कंठी, काळे मनी व गोफ असलेली किं. 2,10,000 रू 2) अंदाजे 3 तोळे पिवळसर धातूची पोहेहार किं. 2,10,000 रू 3) रोख 5,000 रू असा एकुण 4,25,000 रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.व सदरचा गुन्हा उघडकिस आणला असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.



पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ.सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी, हिंगणघाट रोशन पंडीत,यांच्या मार्गदर्शनात देवेंद्र ठाकुर, पोलिस निरीक्षक. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि भारत वर्मा, पोलिस हवालदार प्रशांत ठोबरे,पोहवा यशवंत गोल्हर, विनोद बुरीले,नापोशि राहुल साठे, राकेश आष्टनकर, विकास अवचट,नरेंद्र आरकेर, विशाल बंगाले, पोशि आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, मपोशि सुषमा कावळे यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!