हिंगणघाट गुन्हे पथकाने पकडला शहरात येणारी देशी दारुची खेप….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरित्या देशी दारुची वाहतुक करणारा हिंगणघाट गुन्हे पथकाच्या ताब्यात…

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अंमलदार हे पोलिस स्टेशन  परिसरात पेट्रोलिंग करीत असताना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की नंदोरी चौक, हिंगणघाट येथे दोन इसम एका duet मोपेड वाहनावर देशी दारूची अवैदयरित्या वाहतूक करून माता मंदिर वार्ड हिंगणघाट येथे घेवून येत आहे,





अशशा खात्रीशीर गोपनीय माहितीवरुन सदरची माहीती ठाणेदार मनोज गभने यांना देवून त्यांचे आदेशाने नंदोरी चौक हिंगणघाट येथे पोलिस पथकासह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली. असता मिळालेल्या माहीती प्रमाणे हिरो कंपनीची duet सिल्वर ग्रे रंगाची मोपेड वाहन येतांना दिसल्याने त्यास पथकाचे मदतीने नाकाबंदी करून  थांबवुन सदर वाहन चालकास त्याचे नाव  विचारले असता.त्याने त्याचे नाव  प्रविण गायकवाड वय 32 वर्ष रा. कुंड शेगाव ता.हिगणघाट तसेच मोपेड वाहनाचे मागे बसून असलेल्या इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुदन भगत रा.सुलतानपूर असे सांगितले.



यावरुन पंचासमक्ष मोक्यावर मोपेड वाहनांची पाहणी केली असता मोपेड गाडीचे पायदानवर ठेवून असलेल्या चुगडी मध्ये देशी दारूने भरून असलेल्या प्रीमियम न.1 कंपनीचा 90 ml चा 300 सीलबंद शिश्या प्रती 100 रु. प्रमाणे 30,000 रु. जुनी वापरती हिरो कंपनीची duet सिल्वर ग्रे रंगाची मोपेड वाहन विना नंबरची किंमत 70,000 रु. असा एकून 1,00,000 रू चा माल विना परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने सदरचा माल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,.अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत,पोलिस निरीक्षक.मनोज गभने ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनी अनिल आलंदे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, पोशि आशिष नेवारे विजय काळे, अमोल तिजारे, संदीप बदकी यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!