
गावठी मोहादारुची शहरात वाहतुक करणारा हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात…
हिंगणघाट डि बी पथकाने शहरात दुचाकीवर येणारी ८० लीटर गावठी मोहा दारु पकडली…
हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी पथक हे दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना एक इसम स्मशानघाट रोडने संशयास्पद रित्या दुचाकीवरुन काहीतरी घेऊन जातांना दिसला त्यास थांबवुन त्याचे पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीची तपासनी केली असता तो प्लास्टिक पन्नीमधे गावठी मोहा दारूची वाहतुक करतांना दिसला


सदर ईसमास त्याचेकडील दुचाकीसह ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनील शरबत भोसले वय 39 वर्ष रा. शिवानी पारधीबेडा ता. समुद्रपुर असे सांगीतले त्याचे ताब्यातुन 1) 4 प्लास्टिक पन्नीमधे 18 लीटर गावठी मोहादारु किंमत 12000/-रू 2) TVS मोपेड क्रमांक MH 32 AU 0578 की 80,000/-रू असा एकूण जु. कीं.92,000/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपीविरुध्द पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगणघाट रोशन पंडीत यांचे निर्देशानुसार ठाणेदार पोलिस निरीक्षक मनोज गभने, पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, विवेक वाकडे,पोशि मंगेश वाघमारे,आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली



