स्थानिक गुन्हे शाखेने आंजी येथे पकडला वर्धा शहरात येणारा दारुसाठा…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरांगणा हद्दीत आंजी येथे नाकेबंदी करुन चारचाकी वाहनासह पकडला देशी विदेशी दारुचा 11,48,000/-चा मुद्देमाल….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वर्धा जिल्हयात दारुबंदी असतांना सुध्दा अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते त्यानुसार गणेशोत्सव व इतर महत्वाचे सण शांततेत पार पाडुन या उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये व पोलिस स्टेशन हद्दीत अवैधरित्या चालणार्या अवैध धंद्यांवर आळा बसविण्याचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे अवैध दारु विक्री करणायावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 04/09/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील दोन पथके पो. स्टे. खरांगणा परीसरात अवैद्य धंदयावर प्रो. रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना खबरीकडुन मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. 12 MW 6068 ने मांडवा मार्गे आंजी (मोठी) येथे त्याचे ताब्यातील गाडीमध्ये विदेशी दारू चा मुद्देमाल घेऊन येत आहे.
अशा माहितीवरून सदर ठिकाणी नाकेबंदी केली असता सदर वाहन येतांना दिसून येताच पथकाचे मदतीने नाकेबंदी करून सदर वाहनातील वाहन चालक 1) चेतन गंगाधर कठाणे, वय 28 वर्ष, रा वायफळ ता जिल्हा वर्धा, व त्याचा साथीदार – 2) योगेश साहेबराव येळने, वय 29 वर्ष, राहणार – वार्ड क्रमांक 7 चिंतामणी लेआउट देवळी तहसील देवळी जिल्हा वर्धा, हे मिळून आले त्यांचे ताब्यातून 1) 03 खर्डाच्या खोक्यात रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 144 सिलबंद शिश्या प्रती नग 350/-रू प्रमाने किंमत 50,400/-रू. 2) 06 खर्ड्याच्या खोक्यात ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 276 सिलबंद शिश्या प्रती नग 350/-रू प्रमाने किंमत 96,600/-रू. 3) एक पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. 12 MW 6068 किमत 10,00,000/-रू 4) एक जिओ कंपनीचा कीपॅड मोबाइल किंमत 1,000/रू असा एकुण किंमत 11,48,000/-चा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपी त्यांना जप्त मुद्देमाल कुठून आणला याबाबत विचारले असता आरोपी क्रमांक 3) बार मालक – राजू भांडारकर, रा विरुळ (बघाजी), ता जिल्हा अमरावती याचे कडून खरेदी करून आणल्याचे सांगितल्याने तिन्ही आरोपींविरुध्द पोलिस स्टेशन खरांगणा येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा. पो.हवा. चंद्रकांत बुरंगे, गजानन लामसे, रितेश शर्मा, महादेव सानप, पोलिस अंमलदार मनिष कांबळे, गोपाल बावनकर, अमोल नगराळे, मंगेश आदे, दिपक साठे, अखिलेश इंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.