रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने हिंगणघाट हद्दीतील वणा नदीचे पात्रातुन रेतीची चोरटी वाहतूक करणारे सात (07) ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकुण 50,81,500/-रु चा मुद्देमाल केला जप्त….

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विनापरवाना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन त्याची विक्री करणारे याचेवर कठोर कार्यवाही करण्याचे सक्त आदेश सर्व प्रभारींना तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांना देण्यात आले होते, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके नेमुन त्यांना तशा सुचना देऊन हिंगणघाट उपविभागात रवाना केले





त्याअनुषंगाने दिनांक 09/10/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे  दोन पथके हिंगणघाट उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, वणा नदीचे पात्रात कवळघाट व पारडी नगाजी येथील रेतीघाटातुन ट्रॅक्टरचे ट्राँलीद्वारे रेती चोरी करून हिंगणघाटकडे घेऊन जात आहे. अशी माहिती मिळाल्याने पेट्रोलिंग दरम्यान दोन वेगवेगळी पथके  वणानदी पात्राचे कवळघाट व श्री संत नगाजी महाराज पारडी रेतीघाट परिसरातून हिंगणघाट कडे येणाऱ्या रोडवर नाकेबंदी केली असता, नाकेबंदी दरम्यान वणा नदी कवळघाट कडून हिंगणघाट कडे येतांना चोरुन भरलेले चार ट्रॅक्टर ट्रॉली सह व नगाजी महाराज पारडी येथील रेती घाटातून हिंगणघाटकडे येताना तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीची ओली काळी रेती भरून वाहतूक करीत असतांना नाकेबंदी दरम्यान मिळून आले



सदर प्रकरणात यातील 1) ट्रॅक्टर चालक राजेश सूर्यभान पढाळ, वय 48 वर्ष, राहणार गाडगेबाबा वार्ड, हिंगणघाट, 2) ट्रॅक्टर मालक – राजेंद्र मधुकर उपाध्ये रा. तेलीपुरा चौक (पसार), 3) ट्रॅक्टर चालक – नरेश आनंदराव रामटेके, वय 48 वर्ष, रा. मजुमदार वार्ड, हिंगणघाट, 4) ट्रॅक्टर मालक – दीपक पांडुरंग सुरकार, रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट (पसार), 5) ट्रॅक्टर चालक – संजय शंकरराव कुडसंगे, वय 45 वर्ष, रा. कांदापूर, हिंगणघाट, 6) ट्रॅक्टर मालक – स्वप्निल देविदास सुरकार, रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट (पसार), 7) ट्रॅक्टर चालक – गजानन हरिदास मोरे, वय 35 वर्ष, रा. गाडगेबाबा वार्ड, हिंगणघाट, 8) ट्रॅक्टर मालक – जीतेंद्र ब्रिजमोहन चव्हाण, रा. टिळकवार्ड हिंगणघाट (पसार), 9) ट्रॅक्टर चालक – संजय गजानन पाहुणे, वय 27 वर्ष, रा. संत कबीरवाड हिंगणघाट, 10) चंद्रकांत शंकरराव मुंढोळकर, वय 24 वर्ष, रा. पिंपळगाव ता. हिंगणघाट जि. वर्धा, 11) मनोज तुकाराम मेश्राम, वय 32 वर्ष, रा. पिंपळगाव ता. हिंगणघाट जि. वर्धा, 12) ट्रॅक्टर मालक – निलेश ठोंबरे (पसार) रा. हिंगणघाट, 13) ट्रॅक्टर मालक – सौरभ पांडे (पसार) रा. हिंगणघाट हे आरोपी त्यांचे ताब्यातील सातही ट्रॅक्टरद्वारे शासनाचा कोणताही पास परवाना ( रॉयल्टी ) नसतांना अवैधरित्या  परवाना नसतांना ओल्या काळ्या रेतीची वाहतूक करीत असतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून दोन वेगवेगळ्या कार्यवाहीतून सात ट्रॅक्टर, ट्रॉली व 7 ब्रास (700फुट) रेतीसह *एकुण 50,81,500/-* रुपये चा मुद्द्यामाल जप्त करण्यात आला. सदर नमुद आरोपीचे विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दोन वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोउनि उमाकांत राठोड पोलिस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, महादेव सानप, रामकिसन ईप्पर, अमोल नगराळे, विकास मुंढे, अरविंद इंगोले, सुगम चौधरी, रितेश गेटमे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!