पुलगाव येथील कुख्यात गुंड कुनाल याचेवर वर्धा पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुलगाव हद्दीतील कुख्यात गुंड व कुख्यात दारुविक्रेता कुणाल रोहनकर याचेवर वर्धा पोलिसांची  एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

पुलगाव(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन, पुलगाव हद्दीतील खडकपुरा, वार्ड क्रमांक ०६, नाचनगाव ता. देवळी जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड कुणाल ऊर्फ महादेव ऊर्फ देवाभाई वासुदेव रोहणकर, वय २६ वर्ष, रा. खडकपुरा, वार्ड क्रमांक ०६, नाचनगाव ता. देवळी जि. वर्धा याचे विरुध्द पोलिस स्टेशन, पुलगाव अभिलेखावर सन २०२० पासुन शरीराविरुध्द, मालमत्तेविरुध्द तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत एकुण ०९ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये घातक शस्वासह बाळगणे, शस्त्र बाळगुन गंभीर दुखापत करणे, चोरी करणे, विनयभंग करणे, दारुची वाहतूक करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत





कुख्यात गुंड कुणाल ऊर्फ महादेव ऊर्फ देवाभाई वासुदेव रोहणकर हा सतत गुन्हे करण्याच्या सवईचा गुन्हेगार आहे. त्याचेविरुध्द  संपूर्ण ०९ गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. मागील ४ ते ५ वर्षापासुन सदर ईसम कुणाल ऊर्फ महादेव ऊर्फ देवाभाई वासुदेव रोहणकर, वय २६ वर्ष, रा. खडकपुरा, वार्ड क्रमांक ०६, नाचनगाव ता. देवळी जि. वर्धा याने पोलिस स्टेशन, पुलगाव व नाचनगाव परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनिक जिवन विस्कळीत झाले होते.



सदर ईसम कुणाल ऊर्फ महादेव ऊर्फ देवाभाई वासुदेव रोहणकर, याचे कृत्यांमुळे पोलिस स्टेशन, पुलगाव अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत  असल्याने त्याचे व त्याचे गुन्हेगारी करण्याचे प्रमाण थांबत नसल्याने त्याचे विरुध्द सन २०२३ मध्ये कलम ११० फौजदारी प्रकीया संहीता, सन २०२४ मध्ये कलम १०६, ११६(३) फौजदारी प्रकीया संहीता अन्वये प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आल्या होत्या. परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे व सतत गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले.



त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक राहुल सोनोने यांनी  महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक अनुराग जैन,  वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिहाधिकारी, वर्धा मा. वान्मथी सी. यांना केला होता. त्या अनुषंगाने मा. जिहाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी , वर्धा यांनी दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास नागपुर मध्यवती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.

आगामी येणारे सण उत्सव निर्भीड व शांततापूर्ण वातावरणात पार पडण्याचा उद्देशाने अशा अवैधरीत्या दारुविक्रेत्यांवर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्या करीता पुरवठा करण्याऱ्या दारुविक्रेत्यांवर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी., तसेच पोलिस अधिक्षक अनुराग जैन, यांनी दिलेले आहे.

सन २०२४ मध्ये आज पावेतो एकुण १९ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत जेल मध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच सन २०२५ मध्ये अद्याप पावेतो ०५ अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना जेल मध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.मा. जिल्हाधिकारी, वर्धा पोलिस अधिक्षक, वर्धा यांचे बेधडक मोहीमे मुळे अवैध दारु विक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती मध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव  राहुल चव्हाण, पो.नि. विनोद चौधरी, स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शना खाली स.पो.नि. पंकज वाघोडे, स.फौ. संजय खल्लारकर, पो.हवा. अमोल आत्राम, पो.हवा. आशिष महेशगौरी नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि. राहुल सोनवणे, पोलीस अंमलदार राजेंद्र हाडके, विनोद रघाटाटे, रितेश गुजर, शेखर चुटे पोलीस स्टेशन, पुलगाव





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!