चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला २४ तासाचे आत रामनगर डी बी पथकाने केली अटक…
चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला 24 तासाचे आत रामनगर पोलिसांनी अमरावती येथुन केली अटक…
वर्धा (प्रतिनिधी) – वर्ध्यात एक धक्कादायक घटना घडली होती ज्यामध्ये आरोपीने फोनवर झालेल्या वादातून घरात शिरून एका तरुणाला (34 वर्षे) मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. ही घटना रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील त्रिमूर्तीनगर भागात रविवार (दि.13) रोजी रात्री घडली होती. निलेश सुधाकर वांढरे (34 वर्षे) असे त्या तरुणाचे नाव आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक अनुराग जैन आणि अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकासह 11 पथके रवाना केली होती. ज्यामध्ये शेवटी रामनगर डि बी पथकाने फरार आरोपीला 24 तासांच्या आत शिताफीने अटक केली.
याबाबत सविस्तर व्रुत्त असे की निलेश आणि त्याची पत्नी हे मुलांसोबत महाप्रसाद घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते महाप्रसाद घेऊन घरी येत असताना अवघ्या काही मिनिटांमध्ये हिंगणघाटच्या टिळक वॉर्ड भागातील रहिवासी असलेला सचिन अशोक पाराशर हा तोंडाला रुमाल बांधून आला. हातात चाकू आणि तोंडावर रुमाल बांधलेला व्यक्ती अचानक घरात आल्याने घाबरलेल्या निलेशच्या पत्नीने मुलांना सोबत घेत घरातील स्वच्छतागृहात स्वतःसह मुलांना सुरक्षित केले. दरम्यान धारदार चाकूने सचिन याने निलेशवर हल्ला केला. या हल्ल्यात निलेशच्या पोटावर, छातीवर, हातावर गंभीर वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या नंतर आरोपी सचिन याने चाकू फेकून लगेच दुचाकीवरून पोबारा केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकासह 11 पथके रवाना केली होती.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकासह पोलिस स्टेशन रामनगर, सेवाग्राम, वर्धा शहर आणि सावंगी मेघे अशी एकूण 11 पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. या मध्ये रामनगर पथकाला माहिती मिळाल्या नंतर तांत्रिक विश्लेषण तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी सचिन अशोकराव पाराशर (वय 38 वर्ष) रा.टिळक चौक हिंगणघाट, जि.वर्धा हा नजीकच्या राज्यात पळुन जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्या आधीच पथकाने त्याला मौजा धामोरी, पोलिस स्टेशन खोलापुर अमरावती ग्रामीण हद्दीतील त्याच्या मामाच्या घरून 24 तासांच्या आत शिताफीने अटक केली.
अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक.सार्थक नेहेते,सपोनी राजेश जोशी, पोहवा गिरीश चंदनखेडे, नापोशी. ऋषिकेश घंगारे, पोशी.चेतन पापळे, अमोल गीते यांनी केली आहे.