पुलगाव पोलिसांची वाळु माफियांवर कारवाई…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुलगाव पोलिसांची वाळु माफियांवर कारवाई….

पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने गेल्या १५ दिवसापासुन वाळु तस्करांवर होणार्या चौफेर कार्यवाहीने सगळे वाळु तस्कर सैरभैर झालेत सरकारचा महसुल बुडवुन लाखोंचा मलीदा लाटनारे आता विवंचनेत पडलेत की काय करावे आता





त्यातच  दि.07/04/2024 रोजी सकाळी पुलगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचुन पुलगाव पोलीसांनी वाळु माफियांवर दोन कारवाया केल्या असुन एका कारवाईत 1) एक हिरव्या रंगाचा जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच./32/ए./6763 ज्याची अंदाजे किंमत 6,00,000/- रू. 2) एक हिरव्या रंगाची ट्राली क्रमांक एम.एच./32/ए./6764 ज्यामध्ये वाळु भरून असलेली अंदाजे किंमत 1,50,000/- रू. 3) अंदाजे 1 ब्रास वाळु अंदाजे किंमत 7,000/- रू. 4) एक जुनी वापरती काळया रंगाची हिरो स्प्लेंडर गाडी क्र. एम.एच./32/ए.टी./0897 अंदाजे किंमत 40,000/- रू. 5) एक सॅमसंग कंपनीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल अंदाजे किंमत 15,000/- रू. 6) एक रिअलमी कंपनीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल अंदाजे किंमत 12,000/- रू. असा एकुन किंमत 8,24,000/- रू. चा माल जप्त करण्यात आला



सदर गुन्हयात 1) शुभम राजेन्द्र लोखंडे, वय 27 वर्श, रा. कवठा झोपडी, ता. देवळी 2) विधीसंघर्शीत बालक 3) चालक/मालक प्रविण गवते, रा. नाचणगाव, ता. देवळी (पसार) यांना आरोपी करण्यात आले. तर दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर चे चालक मालक ट्रॅक्टर चालक सतिश रमेषराव नान्हे, रा. नाचणगाव ट्रॅक्टर मालक जगदिश भिमरावजी मस्के, रा.पुलगाव चालक शुभम विष्णू सरवे, नाचणगाव ट्रॅक्टर मालक बबलु अरूणराव मेंढे, रा, भिमनगर, पुलगाव यांचे ताब्यातुन दोन ट्रॅक्टर व त्या ट्रॅक्टर ला लागुन असलेल्या दोन्ही ट्राली मध्ये वाळु भरून असे 15,10,000/- रू. चा माल जप्त करून सदर दोन्ही ट्रॅक्टर व ट्रालीचे मालकांवर कारवाई करने बाबत तहसिल कार्यालय, देवळी यांना पत्र देवुन पुढील कारवाई करीता मा. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय, देवळी यांचे ताब्यात देण्यात आले. वरील दोन्ही कारवाईत पुलगाव पोलीसांनी एकुण जु.कि. 23,34,000/- रू. चा माल जप्त केला आहे. पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव  राहुल चव्हाण, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस  पो.स्टे. पुलगाव, पोलिस उपनिरिक्षक जाधव, स.फौ. सुधीर लडके, पोहवा रितेश गुजर, चंद्रषेखर चुटे, पो.शि विश्वजित वानखेडे, ओम तल्लारी, उपविभागीय पोलिस कार्यालयाचे शुभम कावळे, प्रणय इंगोले, रामदास दराडे, भुषन हाडके यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!