पुलगाव पोलिसांनी हातभट्टीची मोहा दारु गाळणार्याच्या आवळल्या मुसक्या,तिघ
हातभट्टीची दारु गाळणारे पुलगाव गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ताब्यात,सडवा रसायन सह मुद्देमाल केला जप्त…
पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी -याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (10) रोजी पोलिस स्टेशन पुलगाव येथील गुन्हे प्रकटीकरण पथक अवैध धंदे कार्यवाही कामी पेट्रोलिंग करीत असतांना मौजा शहापुर शेत शिवारातील हरीभाऊ दाभेकर यांच्या शेतामधे असलेल्या विहीरीवर दोन ईसम गावठी मोहा दारु ची हातभट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळीत आहे अशा माहीती वरुन पोलिस पथकाचे मदतीने नमुद ठिकाणी छापा घातला असता यातील आरोपी 1) वृक्षय मारोतराव शिवरकार वय 32 वर्ष रा. विटाळा ता, धामनगाव जिल्हा अमरावती 2)सौरभ संजय बावने वय 28 वर्ष रा, वल्लभनगर गुंजखेडा. ता.देवळी जि वर्धा हे संगनमताने गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळीत असतांना रंगेहात मिळुन आले.
तसेच त्याचे ताब्यातुन व मौक्यावरुन 1)दोन लोखंडी ड्रम मध्ये प्रती ड्रम मधे 100 लिटर प्रमाने एकुन 200 लीटर उकळता मोहा रसायन सडवा प्रति लिटर 100/-रुपये प्रमाणे 20,000 /- रुपये व दोन लोखंडी ड्रम की 2000/रु 2) पाच प्लास्टीक ड्रम मध्ये प्रती ड्राम मधे 200 लिटर प्रमाने एकुन 1000 लीटर कच्चा मोहा रसायन सडवा प्रति लिटर 100/-रुपये प्रमाणे 1,00,000 /- रुपये व पाच प्लास्टीक ड्रम की 5000/रु 3) तीन प्लास्टिक कँन मध्ये 36 लिटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 150/- रुपये प्रमाणे 5,400/- रुपये व तीन प़्लॉस्टीक कँन की 600/रु 4) दोन जर्मन घमीले किमंत 1000/- रुपये 5) ईतर भट्टी साहीत्य की 2000/ रुपये असा एकुण 1,36,000/- रु चा माल मिळुन आल्याने जप्त करुन आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक. नूरुल हसन,,अपर पोलिस अधिक्षक डॅा.सागर रतनकुमार कवडे,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव राहुल चव्हाण पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे पो.स्टे पुलगाव यांचे मार्गदर्शनात, पोलिस स्टेशन पुलगाव येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हवा.चंद्रशेखर चुटे , अमोल जिन्दे, रविंद्र जुगनाके, यांनी केली आहे.