पुलगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन,संपुर्ण मुद्देमाल केला हस्तगत…
बंद घराचे दाराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन चोरी करणाऱ्यांना पुलगाव पोलिसाच्या केले जेरबंद…
पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी विकास श्रवन अरोरा हे पुलगांव येथील पंचधारा रोड वरील ड्रीम पार्क कॉलोनी मध्ये राहतात दि.29/04/2024 चे सायकांळी 05/00 वा. शारदा माता म्हैयर मध्यप्रदेश येथे सहपरिवार दर्शनाकरीता गेले असता दिनांक 02/05/2024 रोजी सकाळी 8.30 वा. दरम्यान घरी परत आले असता त्याच्या घरातील मेन दरवाजा कुलुप तुटलेला दिसता आतमधील दरवाजा सुध्दा तुटलेला दिसला तेव्हा फिर्यादी याने घरात जावुन पाहीले असता घरातील आलमारीतील कपडे तसेच घरातील टि.व्ही खाली पडलेला दिसला व इतर घरगुती वस्तु जमीनीवर अस्थाव्यस्त पडलेले दिसले त्यावेळी फिर्यादी ने घरातील आलमारी ची पाहणी केली असता आलमारीचे लाँकर खुले दिसुन आले लॉकर मध्ये ठेवुन असलेले 1) दोन चांदीच्या तोरड्या वजन अंदाजे 20 ग्रॅम वजनाची किमंत अंदाजे 8000/-रु. 2) एक चांदीचा कडा 05 ग्रम किमंत 2000/-रु. 3) दोन भरुन असलेले इंन्डेन कंपनीचे सिलंडर अंदाजे किमंत 2000/-रु. 4) दोन लहान मुलांचे गुलक्क त्यामध्ये अंदाजे किमंत 4000/-रु. 5) बि.पी.आणि शुगर ची मशिन अंदाजे किमंत 4000/-रु. 6) नगदी 64000/-रु. असा एकुण जुमला किमंत 84000/-रु. चा माल कोणीतरी अज्ञात इसमाने दिनांक 29/04/2024 चे सायंकाळी 05/00 वा. ते दिनांक 02/05/2024 चे सकाळी 08/30 वा. दरम्यान घराचे गेटचे मेन दरवाजाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन वर नमुद केलेल्या चिजवस्तु व नगदी रुपये चोरुन नेला
अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरुन पोलिस स्टेशन पुलगाव येथे अपराध क्रमाक 0401/2024 कलम 380,454,457 भादवि चा गुन्हा नोद केला असुन सदरचा गुन्हा पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.फौ.सुधिर लडके हे तपास करीत असताना यातील गोपनीय माहीतीगारांकडुन माहीती मिळाली की सदरचा गुन्हा 1) यश उर्फ शेशकुमार इंगळे वय 21 वर्ष याने त्याचा साथीदार 2) सुरेंद्र उर्फ मोंटु प्रमोदराव ढेंगे वय 24 वर्ष दोघेही रा.गांधी नगर पुलगाव ता.देवळी जि.वर्धा गांधी नगर पुलगाव यांचे मदतीने केला असल्याचे गोपनीय माहीतीवरुन यश उर्फ शेषकुमार इंगळे यास ताब्यात घेवुन त्यानी सुरेंद्र उर्फ मोंटु याचेसोबत केल्याचे कबुली दिली
आरोपी क्र १ यांचे ताब्यातुन 1) दोन चांदीच्या तोरड्या अंदाजे वजन 20 ग्रँम वजनाची अंदाजे किमंत 8000/- रु. 2) एक चांदीचा कडा अंदाजे वजन 05 ग्रॅम किमंत 2000/- रु. 3) एक भरुन असलेले सिलेंडर अंदाजे किमंत 10000/- रु. 4) बि.पी.व शुगर मोजण्याचे मशिन अंदाजे किमंत 4000/- रु. असा एकुण जुमला किमंत 15000/-रु. तसेच आरोपी क्र. 2 यांचे ताब्यातुन एक इण्डेन कंपनीचे सिलेंडर अंदाजे किमंत 1000/-रु. व चोरी करते वेळी कुलुप तोडण्यासाठी वारलेली लोखंडी सळाख अंदाजे किमंत 100/- रु. तसेच आरोपी क्र. 1 व 2 यांनी पो.स्टे.ला दाखल अपराध क्रमाक 241/2024 कलम 380,457 भा.द.वी.चे गुन्ह्यातील चोरीस केलेला मुद्देमाल त्यांचे ताब्यातुन दोन मोबाईल फोन तसेच एक पिवळ्या धातुचे गळ्यातील पोत व दोन पिवळ्या धातुच्या कानातील बिऱ्या जप्त करण्यात आल्या
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक,डॅा.सागर रतनकुमार कवडे,.सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली राहुल सोनवणे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन पुलगाव यांचे सुचनेप्रमाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सफौ सुधिर लडके,पोलिस हवा रितेश गुजर, ओमप्रकाश तल्लारी,विश्वजीत वानखेडे यांनी केली आहे.