
अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन तीची चोरटी वाहतुक करणारा हिंगणघाट डी बी पथकाचे ताब्यात…
अवैधरित्या उत्खनन करुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात….
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात शांतता राहावी याअनुशंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी पथकाचे अंमलदार हे दि 18 जानेवारी रोजी पोलिस स्टेशन ला हजर असताना गोपनीय माहिती मिळाली की, एक लाल रंगाचा सोनालीका ट्रॅक्टर हा वना नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून डकिंग रोडने शहरात येनार आहे


त्यानुसार.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती प्रभारी ठाणेदार चंद्रकांत पाटील यांना देवून त्यांचे आदेशाने डि बी पथकाने व पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे लोटन चौक येथे नाकेबंदी केली असता हिंगणघाट शहरांकडे कडे येणाऱ्या ट्रॅक्टरला थांबण्याचा इशारा देऊन थांबवुन व ट्रॉलीची पंचा समक्ष पाहणी केली असता ट्रॉलीमध्ये काळी रेती भरून असल्याचे दिसले. सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पराते वय 39 वर्ष रा.माता मंदिर वॉर्ड हिंगणघाट असे सांगितले.

यावरून सदर वाहन मालकास व वाहनाच्या कागदपत्राबाबत विचारले असता सदर वाहन मालक व चालक स्वतः असल्याचे व वाहणाचे कागदपत्र नसल्याबाबत सांगितले.सदर वाहन चालकाच्या ताब्यातुन 1)1.20ब्रास रेती कि. 7000 रु 2) बिना क्रमांकाचा लाल रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर किंमत 4 लाख रु.3) ट्रॉली क्रमांक MH 32 A 7332 किमत 1 लाख असा एकून कि. 5, 07, 000/- रु चा मुद्देमाल जप्त करून सदर ट्रॅक्टर चालक विरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदरची कार्यवाही.पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे,. उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगणघाट रोशन पंडीत यांचे निर्देशानुसार पोलिस निरीक्षक मनोज गभने, व प्रभारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, विवेक वाकडे, पोशि मंगेश वाघमारे,आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली.


