वाळुची चोरटी वाहतुक करणारा पुलगाव पोलिसांचे ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

विनापरवाना वाळुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यास पुलगाव पोलिसांनी घेतले ताब्यात…..

पुलगाव(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,- दिनांक 03/04/2024 रोजी रात्री 01.45 वा.चे दरम्य़ान मुखबीर कडून मिळालेल्या खबरेवरुन पोलिस पथकाचे मदतीने वर्धा-पुलगाव हायवे रोडवर सी.ए.डी.रेल्वे गेट,जवळ पुलगाव कडे मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार टिप्पर क्रमांक MH 32 AJ 3919 हा अवैद्यरित्या वाळुची चोरी करून वाहतूक करीत आहे अशा खबरेवरून नाकेबंदी केली असता खबरेप्रमाणे असणारा टिप्पर क्रमांक MH 32 AJ 3919 हा वर्धा कडून पुलगाव कडे येतांना दिसला त्या टिप्पर ला थांबवून सदर टिप्परची पाहणी केली असता टिप्परमध्ये वाळु भरून दिसल्याने टिप्पर चालक यांस त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने निलेश प्रभाकर लसुंते वय 28 वर्ष रा.बोरवघळ,ता.धामणगाव (रेल्वे),जि.अमरावती असे सांगीतले





त्यास सदर टिप्पर मधील वाळु कोठून आणली व कोणाची आहे, व त्याच्या वाहतूकीबाबत परवाना (राँयल्टी) आहे काय असे विचारले असता टिप्पर चालक याने सदर टिप्पर व वाळु ही संतोष पनपालीया रा.आर के काँलनी पुलगाव यांची असुन मी मजुरीने चालक म्हणून त्याचेकडे कामावर आहे व सावंगी वाळुचे घाट (आजनसरा) येथून वाळु आणली असून व वाळुचे वाहतुकीचा कोणताही परवाना (राँयल्टी) नसल्याचे सांगीतले त्याचे ताब्यातून (1) वाळु अंदाजे 4 ब्रास किंमत 24000/- रू. (चोवीस हजार रूपये), (2) एक जुने वापरते टिप्पर क्र.MH 32 AJ 3919 किं.14,00,000/-रू.(चौदा लाख रूपये), (3) टिप्पर चालक निलेश प्रभाकर लसुंते याचे अंगझडतीत एक विवो वाय 200 5G कंपनिचा मोबाईल किं.22000/-रू.(बावीस हजार रूपये) असा एकूण जु.किं.14,46,000/-रू.(चौदा लाख छेचाळीस हजार रूपये) चा माल जप्त केला.
सदर टिप्पर क्रमांक MH 32 AJ 3919 चा मालक संतोष पनपालीया आर के काँलनी पुलगाव याने टिप्पर चालक निलेश प्रभाकर लसुंते याचे मदतीने विनापास परवाना अवैद्यरित्या रेतीची (गौणखनिज) संगणमताने चोरी करून चालक निलेश प्रभाकर लसुंते याचे मदतीने वाहतुक करतांना मिळून आल्याने दोन्ही आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद असून पुलगाव पोलिस अधिक तपास करीत आहे.
सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक  नूरुल हसन,अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव राहुल चव्हाण,पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे.पो.स्टे पुलगाव यांचे मार्गदर्शनात,पोलिस उपनिरीक्षक. संदीप चव्हाण, पो.हवा रितेश गुजर, शरद सानप,शुभम कावळे, प्रणय इंगोले यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!