
रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी करुन चोरटी वाहतुक करणार्यावर सहाय्यक पोलिस अधिक्षक राहुल चव्हाण यांची धडाकेबाज कार्यवाही,१.५ कोटीचा मुद्देमाल केला जप्त…
सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी करुन चोरटी वाहतुक करणार्यावर कार्यवाही करत १ कोटी ५० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
समुद्रपुर(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 02.मार्च रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगांव राहुल चव्हाण यांना नाईट पेट्रोलिंग दरम्यान खबरीद्वारे गोपनीय माहीती मिळाली की, भंडारा येथुन गिरड़ मार्गाने समुद्रपुर कडुन मोठ्या ट्रकने रेतीची चोरटी वाहतुक केली जाणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी गिरड-समुद्रपुर रस्त्यावर नाकाबंदी करून गिरड कडून एका मागे एक ट्रक येतांना दिसले सदरचे ट्रक थांबवुन विचारपुस केली असता त्यांनी त्यामधे रेती असल्याचे सांगीतले


यावरुन सर्व ट्रकची ताडपत्री खोलुन पाहणी केली असता त्यात गौण खनिज रेती असल्याचे दिसुन आल्याने त्यांना रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगीतले. सदर ची रेती ही भंडारा येथून ट्रक मालकाचे सांगण्यावरून भरून आणल्याचे सांगीतले यावरुन सर्व ६ ट्रकमधुन ६० ब्रास रेती किंमत ३,00,000/- रू. व ६ ट्रक/टिप्पर किंमत १,४७,00,000/- रू. असा एकुण १,५0,00,000/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

तसेच यातील 1) शेख रशिद शेख हबीब, रा. हबीब नगर अमरावती, ता. जि. अमरावती.2) मनिल जंगु धुर्वे, रा. कसाईखेडा अमरावती ता. जि. अमरावती.३)अतुल अशोक भगत, रा. हुसनापुर ता. देवळी, जि. वर्धा ५)निकेश सुखदेव मेश्राम, रा. कारला चौक, वर्धा ता. जि. वर्धा ६) प्रतिम अशोक उईके, रा. सेलडोह, ता. सेलू जि. वर्धा ७)पंकज भोलाजी मडावी, रा. सेलडोह, ता. सेलु जि. वर्धा ८) शेख नसीब शेख रफिक, रा. ताजनगर अमरावती, ता. जि. अमरावती.९) शैलेश चंद्रकांत शेंद्रे, रा. तिगांव वर्धा १०) तुषार रमेश सोनटक्के, रा. रा. सेलडोह, ता. सेलु जि. वर्धा ११) शेख रूबेज अजिज शेख, रा. स्टेशनफैल, वर्धा यांना ताब्यात घेण्यात आले असुन १२) जुबेर खान्, रा. अमरावती (पसार) १३)बब्लु उर्फ ईरशाद पठाण, रा. वर्धा (पसार) १४)बब्लु उर्फ ईरशाद पठाण, रा. वर्धा (पसार) या सर्वाविरुध्द पोलिस स्टेशन समुद्रपुर येथे अप क्र 139/25 कलम 303(2), 3(5), भारतीय न्याय संहिता, 2023 सहकलम 3(1)/181,130/177 मोवाका सहकलम 48(7), 48(8) जमीन महसुल अधिनियम गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु पोलिस स्टेशन समुद्रपुर करीत आहे

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचे प्रत्यक्ष नेत्रुत्वात सपोनि रविंद्र रेवतकर ठाणेदार पोलिस स्टेशन समुद्रपुर,पोउपनि अनिल दरेकर, पोलिस स्टेशन समुद्रपुर,पोशि रामदास दराडे,शुभम कावडे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पुलगाव यांनी केली


