
बोटीच्या सहाय्याने रेतीचे अवैधरित्या उत्खनन करुन त्याची चोरटी वाहतुक करणारे LCB चे ताब्यात….
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील महाकाळ येथील धाम नदी पात्रातून 02 इलेक्ट्रिक मोटर पंप बोटी द्वारे रेती उत्खनन करणारे तसेच रेतीची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ११ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त..
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 16 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहीती मिळाली की पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीत मौजा महाकाळ येथील धाम नदीचे पात्रातुन काही ईसम अवैधरित्या बोट लावुन पंपाचे सहाय्याने उत्खनन करुन रेतीची चोरटी वाहतुक करतात अशा गोपनीय माहीतीवरुन अवैध धंद्यावर कार्यवाहीची मोहीम राबवित असतांना गोपनीय माहितीच्या आधारे सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी पथकासह छापा टाकला असता सदर ठिकाणी ट्रॅक्टर चालक/मालक मंगेश नामदेवराव राऊत, वय 35 वर्ष, रा महाकाळ हा आढळुन आला


त्याचे ताब्यातुन घटनास्थळावरुन एक जुना वापरता सिल्वर रंगाचा आईचर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. MH 32 P 3369 चे लाल रंगाच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास काळी ओली रेती (100 फुट) भरून रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आला. सदर ट्रॅक्टर चालक-मालक यास रेतीबाबत विचारणा केली असता त्याने आरोपी 2) मंगेश करलुके (पसार), 3) भरत भोंगाडे (पसार) सर्व रा महाकाळ यांनी मौजा महाकाळ शिवारातील धाम नदीचे पात्रात शिवर इलेक्ट्रिक मोटर पंप ची पाण्यावर तरंगनारी बोट तयार करून तीचे साह्याने धाम नदीचे पात्रातून काळी ओली रेती चे उत्खनन करून सदरची रेतीची चोरटी वाहतूक करण्याकरिता ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरून नेतांना आढळुन आला

त्यावरून धाम नदीचे पात्राची पाहणी केली असता त्या ठिकाणी 02 इलेक्ट्रिक मोटर पंप बोटी रेती उपसा करतांना दिसुन आल्याने त्यांना पंचासमक्ष नमुद ठिकाणावरुन 1)एक जुना वापरता सिल्वर रंगाचा आईचर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. MH 32 P 3369 किंमत 6,00,000/- रू. 2)एक लाल रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली कि. 2,00,000/- रु, 3)1 ब्रास (100 फुट) काळी ओली रेती कि. 5,000/-रु., 4)2 लुबी बी.एम. 619 कंपनीची 7.5 एचपी. पाण्यातील इलेक्ट्रिक मोटर पंप किं. 2,50,000/- रु., 5)2 पिवळ्या रंगाच्या चैनपुली किं. 30,000/- रु., 6)अंदाजे 100 फूट इलेक्ट्रिक केबल, 2 स्टार्टर, पाईप, प्लास्टिक ड्रम व इतर साहित्य किं. 25,000/- रु. असा एकुण 11,10,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यावरुन ट्रॅक्टर चालक मालक व रेती उत्खनन करणारे आरोपी विरुध्द कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक,डॅा. सागर रतनकुमार कवडे यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे पोहवा गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भूषण नीघोट, रितेश शर्मा, मनीष कांबळे, पोशि अमोल नगराळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे, दीपक साठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.


