
वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर अल्लीपुर पोलिसांची कार्यवाही….
अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर अल्लीपुर पोलिसांची कार्यवाही….
अल्लीपुर(वर्धा)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसांपासुन पोलिस अधिक्षकांनी वाळु माफीयांना सळो की पळो करुन सोडलय,त्यामुळे वाळुमाफीयांचे धाबे दनानले आहेत परंतु तरी सुध्दा काही वाळुतस्कर छोट्या ट्रॅक्टर ट्रॅालीचा वापर करुन वाळुची वाहतुक करतांना दिसताय अशा प्राप्त माहीतीवरुन पोलिस अधिक्षकांनी सर्व प्रभारींना यांचेवर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले आहे


त्या अनुषंगाने दि.(२७)रोजी अल्लीपुर पोलिसांना माहीती मिळाली की कोसुर्ला रस्त्याने काही तस्कर वाळुची वाहतुक करणार आहे अशा मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन दिनांक 27/05/2024 रोजी रात्री 11/30 वा. अल्लीपुर पोलिसांनी ग्राम कोसुर्ला जवळ तुषार खुनकर रा.सोनेगाव (खुनकर) यांचे मालकीचा टँक्टर अवैध वाळु वाहतुक करतांना मिळुन आला. वरुन टँक्टर चालक किरण हिरामन आडे वय 25 वर्ष रा. सोनेगाव (खुनकर) यांचे ताब्यातील हिरव्या रंगाचा जॉन डिअर कंपनीचा विनाक्रमांकाचा टँक्टर व ट्राली कि.6,00,000/-रुपये व 01 ब्रास वाळु कि.5,000/-रुपये असा एकुन 6,05,000/-रुपयाचा माल जप्त करुन पोलिस स्टेशन अल्लीपुर येथे आणण्यात आला.
तसेच दि(28)चे सकाळी 10.00 वा. दरम्यान अल्लीपुर पोलिसांनी गुप्त बातमीवरुन छापा कारवाई केली असता ग्राम बोरगाव (आलोडा) येथे बालु उर्फ अंगज शंकरराव धायडे वय 42 वर्ष रा.
बोरगाव(आलोडा) यांचे मालकीचा टँक्टर अवैध वाळु वाहतुक करतांना मिळुन आला. वरुन टँक्टर चालक येणोधर बापुजी मुंडकर रा. हळदा ता.ब्रम्हपुरी, जिल्हा- चंद्रपुर हमु. बोरगाव (आलोडा) यांचे ताब्यातील लाल रंगाचा महिंद्र सरपंच कंपनीचा विनाक्रमांकाचा टँक्टर व लाल रंगाची ट्राली कि.6,00,000/-रुपये व 01 ब्रास वाळु कि.5,000/-रुपये असा एकुन 6,05,000/-रुपयाचा माल जप्त करुन पोलिस स्टेशन अल्लीपुर येथे आणन्यात
आला.
दोन्ही प्रकरणी मा.तहसिलदार तथा तालुका दंडाधीकारी हिंगणघाट यांना दंडात्मक कारवाईबाबत प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव राहुन चव्हान यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पोलिस स्टेशन अल्लीपुर सपोनि प्रफुल डाहुले, नापोशि. प्रफुल चंदनखेडे, पोशि. सतिश हांडे यांनी केली.



