
विनापरवाना अवैधरित्या डीझेलची विक्री करणाऱ्यावर सावंगी मेघे पोलिसांची कार्यवाही…
पो.स्टे. सावंगी (मेघे) येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाची सेलुकाटे येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम अन्वये कार्यवाही…
सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे अवैध धंदे संबंधात सुचना व आदेशाप्रमाणे सर्व प्रभारींना कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत


त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी येथील गुन्हे प्रकटीकरण पथकास मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली कि मौजा सेलू काटे येथे राहणारा मदनलाल सुखचंद धुवारे व फतन सुकचंद धुवारे याच्या घरी अवैधरित्या डिझेलची साठवणूक करून डिझेलची अवैधरित्या चोरटी विक्री करीत आहे या खबरेची शहानिशा करुन खात्री होताच याची माहीती ठाणेदार सपोनि संदीप कापडे यांना देऊन अश्या मिळालेल्या माहितीवरून सदर ठिकाणी पोलिस पथकासह मुखबीर यांचे माहितीप्रमाणे मौजा सेलू काटे येथील धुवारे यांच्या घरी जावुन त्यांना अवैधरित्या पेट्रोल डिझेलची साठवणूक केले बाबत घरझडती घेतली असता त्याचे घरुन 540 लि. डिझेल, प्लास्टिक कॅन , इतर साहित्य असा जु.किं. 54,340 रू. चा माल मिळुन आल्याने आरोपी 1) मदनलाल सुखचंद धुवारे , वय 45 2) फतन सुकचंद धुवारे , वय 38 दोन्ही रा. सेलुकाटे ता. जि. वर्धा यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे अप.क्र. 369/24 कलम 3 , 7 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 सहकलम 286 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नुरूल हसन,अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कापडे पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांचे उपस्थितीत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि दिलीप नागपुरे, सतिश दुधाने, पोहवा निलेशसडमाके, अनिल वैद्य,,पोशि अमोल जाधव, निखिल फुटाणे, चालक पोशि सुमित यांनी केली.



