
अवैधरित्या डिझेलची साठवणुक व विक्री करणारा सावंगी मेघे पोलिसांचे ताब्यात….
विनापरवाना विक्रीकरीता डिझेल बाळगणाऱ्यास सावंगी पोलिसांनी घेतले ताब्यात…
वर्धा (प्रतिनिधी) – अवैधरित्या विनापरवाना विक्रीकरीता डिझेल बाळगून त्याची चोरटी विक्री करणाऱ्याला सावंगी पोलिसांनी शिताफीने अटक करून त्यांच्यावर फिर्यादी पोउपनि सतिश दुधाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 719/2024 कलम 3,7 जीवनावश्यक अधिनियम,सहकलम 287 बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोनु ऊर्फ अमजद खान आरीफ खान (वय 41 वर्ष) रा.सेलु ता. सेलु,जि.वर्धा असे आरोपीचे नाव आहे.


या बाबत सविस्तर वृत्त असे की,वर्धा ते पुलगाव रोडवर मौजा निमगाव येथे राजकमल ढाबा येथे अवैधरित्या डिझेलची विक्री व साठवणुक केली जाते अशा गोपनीय माहीतीवरुन दि (6) नोव्हेंबर रोजी संध्या 6 वाजता चे दरम्यान सदर ठिकाणी सावंगी मेघे पोलिसांनी उपविभागिय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे उपस्थितीत छापा टाकला असता सदर ठिकाणी यातील आरोपी सोनु ऊर्फ अमजद खान आरीफ खान (वय 41 वर्ष) रा.सेलु ता. सेलु,जि.वर्धा हा त्याचे ढाब्यावर अवैद्यरित्या विनापरवाना डिझेलचा साठा करतांना मिळुन आला.

सदर ठिकाणी 1)9 प्लास्टीक डबकीत, व एका प्लास्टिक बकेट मध्ये एकुण 260 लिटर डिझेल की.25,700/-रु. जप्त करण्यात आला आहे.तसेच नमुद आरोपीचे विरोधात अप क्र 719/2024 कलम 3,7 जीवनावश्यक अधिनियम,सहकलम 287 बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक संदीप कापडे ठाणेदार पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांचे नेत्रुत्वात पोउपनि. कैलास खोब्रागडे,सफौ नबी शेख डि बी पथकाचे पोहवा सतिश दरवरे,.पोशि हर्षल मुन यांनी केली


