
SDPO वर्धा यांचे पथकाने ॲटोरिक्षा सह पकडला मोहा व देशी दारुचा मुद्देमाल…
वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे पथकाने तिन चाकी अॅटो रिक्षामधे अवैधरित्या विक्रीकरीता येणारा दारूचा मुद्देमाल…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने निवडनुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना देण्यात आले होते


त्याअनुषंगाने दिनांक 13.11.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथक यांना गोपनिय माहीती मिळाली की रेल्वे स्टेशन रोडवरील को ऑप्रेटीव्ह बँक चे मागे सब्जी मार्केट, वर्धा येथे अॅटेरिक्षामधुन दारुची वाहतुक होणार आहे अशा मिळालेल्या बातमीवरुन सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी 1) गोपी रमेश बैस्वार वय 53 वर्षे रा. को- ऑप्रेटीव्ह बँक चे मागे सब्जी मार्केट, वर्धा 2) संदेश विठठलराव भित्रे वय 43 वर्षे रा. समता नगर वर्धा ता.जि. वर्धा त्यांचे ताब्यातुन व घरझडतीतुन 1) एक बजाज कंपनीचा तीन चाकी अॅटोरिक्षा क्र. एम.एच. 32 बी. 6290 त्या अॅटोरिक्षामधे 2) दोन प्लॉस्टीक कॅन मध्ये अंदाजे 42 लिटर, गावठी मोहा दारू मिळुन आली

तसेच आरोपी 02 यांचे घरझडतीतुन 4) 90 एम.एल.च्या टॅगो कंपनीच्या देशी दारू ने भरलेला 90 सिलबंद शिश्या असा एकुन कि. 1,27,800/- रू चा माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले.सदर दोन्ही आरोपीचे विरोधात पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्रमांक 1404/2024 कलम 65 अई, 77 अ 83 म.दा.का. सहकलम 3 (1) 181,130/177 मो.वा.का.अन्वये नोंद करण्यात आला आहे

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक. अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, प्रमोद के. मकेश्वर यांचे याचे विशेष मार्गदर्शनाखाली पोउपनि. परवेज खॉन, उपविभागीय विशेष पथकाचे पो. हवा. अमर लाखे,पोशि मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी केली


