SDPO वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करुन पकडला विदेशी मद्यसाठा,आरोपी फरार…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय पथकाने नाकाबंदी करुन पकडला विदेशी दारूचा साठा,चारचाकी वाहनासह एकुन 10,48,800 /- रू चा मुद्देमाल केला जप्त…

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(7) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथक पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशानुसार व उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली अवैध धंदे दारुविक्री,गांजाविक्री यावर कार्यवाही करणेकरीता वर्धा शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना सुत्राकडुन  गोपनिय माहीती प्राप्त झाली की  नागसेन नगर ते स्नेहल नगर सिमेंट रोडने एक पांढऱ्या रंगाची सुजुकी कंपनीची स्वीफ्ट डिजायर क्र एम. एच 32 ए. एस. 5985 ह्यात दारुची वाहतुक होणार आहे





यावरुन सदर गोपनीय माहीतीची शहानीशा करुन सदरची माहीती वरीष्ठांचे निर्देशनात आणुन सदर रोडवर धम्मकुटी बुध्दविहाराजवळ नाकाबंदी केली असता मिळालेल्या माहीतीप्रमाणे सदर क्रमांकाची कार  नागसेन नगर कडुन येतांना दिसली वरून त्यास पथकातील पोलिसांनी हात देवुन थांबविण्या इशारा दिला असता ते न थांबता गाडी मागे वळवुन पळुन जाण्याचा  प्रयत्न करीत असतांना त्यांची गाडी सिमेंट रोडचे खाली उतरली व गाडी फसल्या सारखी वाटल्याने वाहन चालविणारा व त्याचे बाजुला बसुन असनारा इसम  1) आकाश रविजी गणविर रा. स्नेहल नगर, वर्धा 2 ) वैभव पाटील
रा. इतवारा बजार वर्धा यांनी वाहनाचे दरवाजे उघडुन गल्लीतुन जंगली भागा कडे फरार झाले



तसेच मौक्यावर आरोपींनी विदेशी दारूने भरलेली 1) एक पांढऱ्या रंगाची सुजुकी कंपनीची स्वीफ्ट डिजायर क्र एम. एच 32 ए. एस. 5985 अंदाजे किंमत 9,00,000/- रू त्या वाहनाचे डिक्कीत 2 ) 5 पुर्ण खरडर्याचे खोक्या मध्ये तसेच एका अध्या खरडर्याचे खोक्या
मध्ये 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चाईस कंपनिच्या 264 शिश्या 3) 2 पुर्ण खरडर्याचे खोक्या
मध्ये 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चाईस ब्लु कंपनिच्या 96 शिश्या 4 ) 1 पुर्ण खरडर्याचे
खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑयकॉनिक व्हाईट कंपनिच्या 48 शिश्या 5) 1 पुर्ण खरडर्याचे खोक्या मध्ये 500 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या टुबर्ग कंपनिच्या 24 टिन कॅन 6) 2 पुर्ण खरडर्याचे खोक्या मध्ये 650 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या टुबर्ग कंपनिच्या 24 कॉचेची बॉटल असा एकुन  10,48,800/- रू माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आला असुन
सदर दोन्ही पसार आरोपींचा शोध सुरू असुन ते मिळुन येताच सदर आरोपींना विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस करून सदर गुन्हयात बार मालक यांना आरोपी बनविण्याची तजविज ठेवली आहे.सदर गुन्ह्यांत पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे पसार आरोपीतांविरूध्द 1) अपराध क्रमांक 1075 / 2024 कलम 65 अई, 77 अ, 83, म.दा.का. सहकलम 3(1)181,130 / 177 मो. वा. का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.
स्टे. वर्धा शहर करीत आहे..



सदरची कार्यवाही  पोलिस अधिक्षक नूरूल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे याचे विशेष मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, प्रमोद के. मकेश्वर यांचे सुचनेप्रमाणे
पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोशि मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!