
SDPO वर्धा यांचे विशेष पथकाची सेलु पोलिस स्टेशन हद्दीत मोहादारु गाजणाऱ्यांवर मोठी कार्यवाही….
उपविभागीय पोलिस अधिकारीयांचे विशेष पथकाचा सेलु पोलिस स्टेशन हद्दीत शिवनगाव येथील गावठी मोहादारु भट्टीवर छापा, 12,75,000/- रू कच्चा मोहा रसायन सडवा केला नाश,दोन आरोपी ताब्यात…..
सेलु(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सन उत्सवाचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी दिलेल्या सुचनेच्या अनुरुप उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे सुचनेवरुन दिनांक 18 फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलीस कर्मचारी यांनी गोपनिय माहीती काढुन पोलीस स्टेशन सेलू हददीतील शिवणगांव येथे आरोपी 1) शंकर पुरूषोत्तम पिपंळे वय 40 वर्षे रा. शिवणगांव ता. सेलु जि वर्धा 2) शुभम अरून पिपंळे वय 28 वर्षे रा. शिवणगांव ता.सेलु जि वर्धा हे दोघेही मौजा मोहगांव येथील जंगली भागात वेग-वेगळ्या दोन ठिकाणी गावठी मोहादारू तयार करण्याकरीता कच्चा मोहा रसायन सडवा तयार करीत असतांना मिळुन आले


यावरून त्यांचेवर पंच व पोलिस स्टॉफचे मदतीने प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी शंकर पुरूषोत्तम पिपंळे याचे ताब्यातुन 1) 15 नग लोखंडी ड्रम मध्ये कच्चा मोहा रसायण सडवा प्रति ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे एकुण 3000 लिटर प्रति ली. 200 रू. प्रमाणे एकुण 6,00,000/- रू. 2) 15 नग सडवा ड्रम प्रति नग 1000/- रू प्रमाणे एकुण 15,000/- रू असा जु. कि. 6,15,000/-रूचा माल तसेच शुभम अरून पिंपळे यांचे ताब्यातुन 1) 16 नग लोखंडी ड्रम मध्ये कच्चा मोहा रसायण सडवा प्रति ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे एकुण 3200 लिटर प्रति ली. 200 रू. प्रमाणे एकुण 6,40,000/- रू, 2) 20 नग सडवा ड्रम प्रति नग 1000/- रू प्रमाणे एकुण 20,000/- रू असा जु. कि. 6,60,000/- रू चा माल असा एकुन की. 12,75,000 /- रू चा माल अवैधरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करून जागीच नाश करण्यात आला.

यावरुन पोलिस स्टेशन सेलू येथे आरोपी क्र 1 यांचे विरूध्द अपराध क्रमांक 194/2025 कलम 65 फ. म.दा.का. आरोपी क्रमांक 2 यांचे विरूध्दात अपराध क्रमांक 195/2025 कलम 65 फ. म.दा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. सेलू करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे याचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, प्रमोद के. मकेश्वर यांचे सुचनेप्रमाणे विशेष पथकातील पो.उप.नि. परवेज खॉन,पो.हवा. अमर लाखे, पोशि मंगेश चावरे, पवन निलेकर, तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिणार्थी चैतन्य धनविज यांनी यशस्वी रित्या पार पाडली.


